Aishwarya Rai With Abhishek Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai Bachchan - Abhishek Bachchan : ऐश्वर्या-अभिषेकमधील दुरावा संपला, घटस्फोटाच्या चर्चांना असा मिळाला पूर्णविराम, VIDEO व्हायरल

Priya More

Aishwarya Rai With Abhishek Bachchan:

बच्चन कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दूरावा आला असून हे कपल वेगळे होणार असल्याचा दावा केला जात आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात अनेक मतभेद असून त्यांचे खटके उडत असल्याचे म्हटले जात आहे. या बातम्यांदरम्यान, ऐश्वर्या राय सासरे अमिताभ बच्चन, मुलगी आराध्या बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांच्यासोबत दिसली. ती पती अभिषेक बच्चनच्या कबड्डी संघ जयपूर पिंक पँथर्ससाठी चिअर करताना दिसली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो चर्चेमध्ये आला आहे.

शनिवारी 6 जानेवारीच्या रात्री ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन, आराध्या बच्चन आणि अभिषेक बच्चन हे सर्वजण मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये एकत्र दिसले. तिथे झालेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये सामना पाहण्यासाठी आणि आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी हे सर्वजण सहभागी झाले होते. हे चौघेही अभिषेकसोबत स्टँडमध्ये बसले होते आणि त्यांनी जयपूर पिंक पँथर्सची जर्सी देखील घातली होती. जयपूर पिंक पँथर्सचा सामना यू मुंबाशी झाला होता.

स्टार स्पोर्ट्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर बच्चन कुटुंबाचा हा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडीओ कबड्डी सामना पाहतानाचा आहे. या व्हिडीओमध्ये आराध्याची बदललेली हेअरस्टाईल पाहायला मिळाली. पती अभिषेक बच्चनच्या टीमच्या विजयावर ऐश्वर्याही आनंद व्यक्त करताना दिसली. जिथे मुंबा यू संघाने सामन्यात 31 गुण मिळवले. तर जयपूर पिंक पँथर्सने ४१ गुण मिळवून विजय मिळवला होता.

अभिषेक बच्चन हा बंटी वालियासोबत जयपूर पिंक पँथर्सचा सह-मालक आहे. या संघाने 2014 मध्ये प्रो कबड्डी लीगमध्ये खेळण्यास सुरुवात केली. राज शामानी यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये अभिषेकने संघातील गुंतवणुकीबद्दल बोलले. त्याने सांगितले की, 'आम्हाला काही कळत नव्हते, संघ कसा बनवायचा, संघ कसा सांभाळायचा, याचा खर्च काय आहे. हे खरोखर अंधारात बाण सोडल्यासारखे होते.'

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात काही ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत. एका कार्यक्रमात अभिषेकच्या हातामध्ये त्याच्या लग्नाची अंगठी दिसली नव्हती. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा आला असून हे कपल घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. इतकंच नाही तर ऐश्वर्याने सासरचं घर सोडून मामाच्या घरी शिफ्ट झाल्याचंही काहींनी म्हटलं होतं. मात्र हे सर्वजण त्यांची मुली आराध्याच्या शाळेच्या कार्यक्रमात एकत्र दिसले होते. आता हे कपल पुन्हा एकत्र दिसत असल्यामुळे त्यांच्यामध्ये सर्वकाही सुरळीत चालले असल्याचे म्हटले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT