Bastar The Naxal Story Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bastar The Naxal Story Trailer: अदा शर्माच्या 'बस्तर द नक्सल स्टोरी'चा मन हेलावून टाकणारा ट्रेलर रिलीज

Bastar The Naxal Story Trailer Out: अदा शर्माचा 'बस्तर द नक्सल स्टोरी' (Bastar The Naxal Story Movie) हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरनंतर आता दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Priya More

Adah Sharma Movie:

'द केरळ स्टोरी' (The Kerala Story Movie) या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्माला (Actress Adah Sharma) खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. आता अदा शर्मा लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अदा शर्माचा 'बस्तर द नक्सल स्टोरी' (Bastar The Naxal Story Movie) हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरनंतर आता दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

'बस्तर द नक्सल स्टोरी' एका सत्य घटनेवर आधारित असून या चित्रपटाचा ट्रेलर आज रायपूरमध्ये लाँच करण्यात आला. चित्रपट निर्माते विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन हे 'बस्तर द नक्सल स्टोरी' हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटामध्ये अदा शर्मा पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यावेळी ही कथा नक्षलवाद्यांची असून 'बस्तर द नक्षल स्टोरी' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात आपल्याला नक्षलवादाविरुद्ध युद्ध पाहायला मिळणार असून टीझरनंतर आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अदा नक्षलवाद्यांविरुद्ध लढताना दिसणार आहे.

निर्माता विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या यशानंतर आता अदा शर्मा 'बस्तर द नक्सल स्टोरी' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. 'बस्तर द नक्सल स्टोरी'मध्ये अदा शर्मा आयपीएस नीरजा माधवनची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तुम्हाला ७६ शहीद सीआरपीएफ जवानांच्या हौतात्म्याची कहाणी आणि त्यांचा बदला दाखवण्यात आला आहे.

जर तुम्ही नक्षलवाद्यांबद्दल वाचले किंवा ऐकले नसेल तर या चित्रपटाची कथा तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. कारण यामध्ये त्यांचा खरा चेहरा आणि त्यांची क्रूरता मांडण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये प्रत्येक घराला नक्षलवाद्यांच्या हाती एक मूल कसे द्यावे लागते हे दाखवण्यात आले आहे. गावात नक्षलवाद्यांची दहशतही दाखवण्यात आली आहे. नक्षलवाद्यांविरोधात आवाज उठवल्यास ते त्यांना मारतात. ट्रेलरमध्ये अदाचा अभिनय अप्रतिम दिसत आहे. ज्यामध्ये ती देशभक्तीच्या भावनेमध्ये दिसत आहे.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'बस्तर द नक्सल स्टोरी'मध्ये अदा शर्माशिवाय इंदिरा तिवारीही एका खास भूमिकेत दिसणार आहे. सनशाईन पिक्चर्सच्या बॅनरखाली अशिन ए. शाह यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील भितीदायक म्युझिक आणि हार्ड हिटिंग संवाद हृदयाला स्पर्श करतात. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Shocking: आई-बापाने काबाड कष्ट करत म्हशी घ्यायला पै पै जमवली, मुलानं 'फ्री फायर' गेमसाठी ५ लाख उडवले

GK: भारतातील सर्वात लहान दोन अक्षरांचे नाव असलेले रेल्वे स्टेशन कोणते?

ITR Filling 2025: तुमच्या उत्पन्नानुसार निवडा आयटीआर फॉर्म! कोणासाठी कोणता फॉर्म योग्य? वाचा सविस्तर

Ranveer Singh : 'धुरंधर'चा जबरदस्त टीझर, रणवीर सिंहसोबत रोमान्स करणारी अभिनेत्री कोण? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT