Vidyut Jammwal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vidyut Jammwal: न्यूड फोटोशूटमुळे विद्युत जामवाल ट्रोल, नेटिझन्सनी म्हणाले रणवीर सिंगसोबत राहण्याचा परिणाम

Vidyut Jammwal Trolled: विद्युत जामवालने न्यूड फोटोशूट केले असून ते त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याचे हो फोटो व्हायरल होत असून नेटिझन्सला हे फोटो पाहून चकीत झाले आहेत.

Priya More

Vidyut Jammwal Nude Photoshoot:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) आपल्या जबरदस्त अभिनय आणि स्टंटमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. पण यावेळी विद्युतने असे काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे.

विद्युत जामवालने न्यूड फोटोशूट केले असून ते त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याचे हो फोटो व्हायरल होत असून नेटिझन्सला हे फोटो पाहून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रणवीर सिंगची (Ranveer Singh) आठवण आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता विद्युत जामवालने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेता हिमालयाच्या जंगलात दिसत आहे. विद्युतने तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तो नदीच्या काठावर बसला आहे. दुसऱ्यो फोटोत तो नदीमध्ये उतरलेला दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये तो चुलीवर स्वयंपाक करत आहे. विद्युतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंवर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत. विद्युत जामवालच्या फोटोंना इन्स्टाग्रामवर २ लाखांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत.

विद्युत जामवालने स्वत: आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. त्याने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हिमालय पर्वतरांगांमध्ये माझे परतणे - "देवाचे निवासस्थान" 14 वर्षांपूर्वी सुरू झाले. मला हे समजण्याआधी दरवर्षी 7-10 दिवस एकटे घालवणे हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. जंगलात येताना, मला माझा एकटेपणा शोधायला आवडतो आणि "मी कोण नाही" हे जाणून घेण्याचे महत्त्व समजते. जे "मी कोण आहे" हे जाणून घेण्याची पहिली पायरी आहे तसेच शांततेत स्वतःचे रक्षण करते.'

विद्युतने पुढे लिहिले की,'मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर सर्वात आरामदायक आहे. मी निसर्गाच्या नैसर्गिक वारंवारतेशी सुसंगत आहे आणि मी स्वत:ला सॅटेलाइट डिश अँटेना म्हणून कल्पना करतो. इथेच मी स्वतःला घेरून घरी येऊ इच्छित असलेली ऊर्जा निर्माण करतो. माझ्या जीवनातील एक नवीन अध्याय अनुभवण्यासाठी तयार आहे - पुनर्जन्म.' विद्युत जामवालचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून नेटिझन्स त्यावर जोरदार कमेंट्स करत आहेत.

एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही एकटे असाल तर फोटो कोणी क्लिक केले.' दुसऱ्याने लिहिले की, 'आजपासून याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू, सगळे देशाचे वातावरण बिघडवत आहेत.' तर काहींना असे लिहिले की, 'रणवीर सिंगसोबत राहण्याचा परिणाम.' तर विद्युतच्या चाहत्यांनी त्याचे हे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरून काढून टाकण्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT