Sam Bahadur Teaser Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sam Bahadur Teaser Out: 'सॅम बहादूर'चा जबरदस्त टीझर आऊट, विकी कौशलच्या प्रत्येक डायलॉगने जिंकलं प्रेक्षकांचं मन

Sam Bahadur Movie: या चित्रपटातील विकी कौशलाचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर प्रेक्षक टीझरची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे.

Priya More

Vicky Kaushal Sam Bahadur Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'मुळे (Sam Bahadur) चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून देशातील पहिल्या फिल्ड मार्शलच्या भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे. या चित्रपटातील विकी कौशलाचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर प्रेक्षक टीझरची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

भारतीय लष्कराचे फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित 'सॅम बहादूर' या चित्रपटासाठी सर्वजण आतुर आहेत. विकी कौशल स्टारर या चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला. टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्कंठा वाढली आहे. 'साम बहादूर'चा टीझर समोर आल्यानंतर आता सर्वत्र त्याची जोरदार चर्चा होत आहे. 'साम बहादूर'चा हा टीझर खूपच अप्रतिम आहे.

'सॅम बहादूर'च्या टीझरमध्ये विकी कौशलही भारतीय लष्कराचा गणवेशामध्ये दिसत आहे. 'उरी' चित्रपटानंतर लष्कराच्या गणवेशातील विकीचा लूक खूपच प्रेक्षणीय दिसत आहे. या चित्रपटात विकी कौशल फील्ड मार्शल सॅम मानेकशॉची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट देखील वास्तविक जीवनातील व्यक्तिरेखेवर आधारित आहे. टीझरमध्ये विकी कौशल दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे. त्याची डायलॉग डिलिव्हरी अप्रतिम आहे. या टीझरमधील विकी कौशलच्या प्रत्येक डायलॉगने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

टीझरमध्ये फातमा सना शेख माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. या टीझरमध्ये विकी आणि फातिमाशिवाय 'दंगल' चित्रपटाची अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​देखील दिसत आहेत. सान्याने सॅम मानेकशॉ यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. 'साम बहादूर'च्या टीझरची खास गोष्ट म्हणजे यात देशभक्तीने भरलेले संवाद आहेत.'साम बहादूर'च्या या टीझरला सोशल मीडियावर खूप चांगली पसंती मिळत आहे. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulajapur News: तुळजाभवानी मंदिर परिसरात पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Diya Cleaning Tips : दिवाळीपूर्वी जुन्या पणत्या अन् समई करा नव्यासारखी लख्ख, 'ही' घरगुती ट्रिक २ मिनिटांत करेल काम

Maharashtra News Live Update: जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून खा. उदयनराजे भोसले यांचा अर्ज मागे

Hand Exercises : हाताच्या बोटांमध्ये वारंवार सुन्नपणा जाणवतोय? 'हे' ६ व्यायाम वेळीच करा,नाहीतर....

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात गुजरातमधून आणखी एकाला अटक, नेमकं कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT