Shreyas Talpade With Wife  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade ला रुग्णालयातून डिस्चार्ज, इमोशनल पोस्ट शेअर करत पत्नीने सांगितलं त्या रात्री नेमकं काय घडलं?

Priya More

Shreyas Talpade Health Update:

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) ६ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर अंधेरीतील बेलेव्ह्यू रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. याच ठिकाणी श्रेयसवर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. श्रेयसच्या कुटुंबीयांसाठी आणि चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत होते. अखेर श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला बुधवारी रात्री डिस्चार्ज मिळाला असून तो सुखरूप घरी आला आहे.

श्रेयस घरी आल्यानंतर त्याची पत्नी दिप्ती तळपदेने सुटकेचा निश्वास सोडला. इतक्या दिवस चिंतेत असलेल्या दिप्तीने पती रुग्णालयातून घरी आल्यानंतर सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट करत त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? हे सांगत तिने सर्वांचे श्रेयस बरा व्हावा यासाठी प्रार्थना केलेल्या सर्वांचे, रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले आहे. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिप्तीने श्रेयससोबतचे काही जुने फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'अविश्वसनीय पाठिंब्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहे. तुमचे मेसेज माझ्यासाठी आधारस्तंभ आहेत. मी कदाचित वैयक्तिकरित्या प्रत्येकाला मेसेज करु शकत नसेल, तरी देखील प्रत्येकाचे मनापासून आभार' असे लिहिले आहे.

दिप्तीने पुढे श्रेयससोबतचा एक-एक फोटो शेअर करत त्यावर मेसेज लिहिला आहे. तिने असे लिहिले आहे की, 'माझं आयुष्य, श्रेयस आज सुरक्षितरित्या घरी परतला आहे. मी श्रेयसशी नेहमी भांडायचे की विश्वास कोणावर ठेवायचा. तर आज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालं आहे. हे सर्व घडलं तेव्हा देव माझ्यासोबत होता. तो त्या संध्याकाळी माझ्यासोबत होता जेव्हा आमच्या आयुष्यात ही भयंकर घटना घडली. आता यापुढे मी त्याच्या अस्तित्वावर कधी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. आज मी त्या सर्वांचे आभार मानते ज्यांनी त्या संध्याकाळी मला मदत केली. त्यावेळी मी एकाला मदतीसाठी हाक मारली आणि १० जण धावून आले.'

'श्रेयस कारमध्ये होता. हे त्यासर्वांना माहिती देखील नव्हते. त्यांना हे देखील माहिती नव्हते की ते कोणाला मदत करत आहेत. तरी देखील त्यांनी मला मदत केली. त्या संध्याकाळी ते सर्वजण आमच्यासाठी देवाच्या रुपामध्ये मदतीला धावून आले होते. त्या सर्वांचे मनापासून आभार मानते. मला आशा आहे की, माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी तुमची सदैव ऋणी राहीन. हेच मुंबई शहराचं स्पिरिट आहे. मुंबई हे असं शहर आहे की त्याने आम्हाला एकटं सोडलं नाही.'

दिप्तीने या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, 'मी आमचा मित्र परिवार, कुटुंब आणि आमच्या मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील लोकांचे आभार मानते. त्यापैकी अनेक जण आपली कामं सोडून माझ्या मदतीसाठी आले होते. तुम्ही सर्वजण माझ्यासोबत राहिलात. तेव्हा मी एकटी नव्हते. त्याचसोबत मी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स, स्टाफ ज्यांनी श्रेयसला वाचवलं. सगळेच ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानते.' श्रेयसच्या पत्नीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, 14 डिसेंबर 2023 रोजी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तो 'वेलकम टू जंगल'च्या शूटिंगवरून घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याला आपली तब्येत बरी नसल्याचे वाटले. त्याने तात्काळ पत्नी दिप्तीला याची माहिती दिली. त्याच्या पत्नीने तात्काळ त्याला रुग्णालयात हलवले. पण रुग्णालयामध्ये पोहचण्यापूर्वी श्रेयस बेशुद्ध पडला. रुग्णालयात जाताना त्यांना ट्राफिकचा देखील सामना करावा लागला होता. असे सांगितले जात होते की, ज्यावेळी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्याचे हृदय १० मिनिटांपर्यंत बंद पडले होते. त्याचा को-स्टार बॉबीने ही माहिती सांगितली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

SCROLL FOR NEXT