Shahid Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahid Kapoor Video: IFFI मध्ये स्टेजवर डान्स करताना पडला शाहिद कपूर, व्हिडीओ होतोय व्हायरल

Shahid Kapoor Fallen On Stage Video: या फिल्म फेस्टिवलमध्ये सुपरस्टार शाहिद कपूरने डान्स परफॉर्मन्स केला. पण डान्स करता करता तो स्टेजवर पडतो.

Priya More

IFFI 2023:

गोव्यामध्ये (Goa) सोमवारपासून ५४ व्या इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला म्हणजेच आयएफएफआयला (IFFI) सुरुवात झाली. या फिल्म फेस्टिवलमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrities) चार चाँद लावले. बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टार्सनी आपल्या शानदार आणि जबरदस्त अंदाजमध्ये या फिल्म फेस्टिवलला सुरूवात केली.

या फिल्म फेस्टिवलमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी परफॉर्मन्स देखील करत आहेत. या फिल्म फेस्टिवलमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहेत. अशामध्ये या फिल्म फेस्टिवलमध्ये सुपरस्टार शाहिद कपूरने डान्स (Shahid Kapoor Dance Video) परफॉर्मन्स केला. पण डान्स करता करता तो स्टेजवर पडतो. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधील शाहिद कपूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहिद कपूर स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. पण डान्स करताना शाहिद कपूरचा तोल जातो आणि तो खाली पडतो. शाहिदला पडल्याचे पाहून या फिल्म फेस्टिवलमध्ये आलेले सर्वांना धक्का बसतो. पण सुदैवाने शाहिदला काहीच होत नाही. तो पुन्हा आपल्या हटके स्टाईलमध्ये उभा राहतो आणि डान्स करू लागतो.

अभिनेता शाहिद कपूरचा हा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाहिद कपूर ब्लॅक आउटफिट घालून स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. पण डान्सची एक स्टेप करता करता त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. पण त्याचा त्याला काहीच फरक पडत नाही. स्वत:ला सावरत तो पुन्हा उभा राहतो आणि डान्स करत आपला परफॉर्मन्स पूर्ण करतो. शाहिद कपूरची ही स्टाइल प्रत्येकाला प्रचंड आवडली. या फिल्म फेस्टिवलमध्ये शाहिद कपूरने 'मौजा ही मौजा' पासून ते 'धतिंग नाच' या त्याच्या ब्लॅकबस्टर गाण्यावर डान्स केला. सध्या या व्हिडीओमध्ये शाहिद कपूर चर्चेत आला आहे.

शाहिद कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अभिनेता शेवटी 'ब्लडी डॅडी' या चित्रपटामध्ये दिसला होता. त्याआधी तो 'फर्जी' वेबसीरिजमध्ये दिसला होता. सध्या शाहिद कपूर त्याचा नवीन चित्रपट 'देवा'चे शूटिंग करत आहे. 'देवा' चित्रपटातून शाहिद पुन्हा एकदा त्याच्या अॅक्शन अवताराने चाहत्यांना प्रभावित करताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये शाहिद कपूर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT