Jawan Box Office Collection Day 14 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jawan Box Office Collection Day 14: 'बाहुबली 2'ला मागे टाकण्यात 'जवान'ला यश, आता 'गदर 2' ला टक्कर देणार का?

Priya More

Jawan Movie Collection:

बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहे. या चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत 'बाहुबली २' चित्रपटाला मागे टाकले आहे. या चित्रपटाने १४ व्या दिवशीही बक्कळ कमाई करत आणखी एक रेकॉर्ड मोडला आहे.

जवान चित्रपटाने 'बाहुबली २' चित्रपटाला टक्कर देत १४ व्या दिवशी मागे टाकले आहे. आता शाहरुख खानचा जवान चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. आता या स्पर्धेत अजून दोन चित्रपट बाकी आहेत. 'पठाण' आणि 'गदर २' हे चित्रपट या यादीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जर जवानने या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले तर तो या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर येईल.

'जवान' चित्रपटाच्या दुसऱ्या वीकेंडच्या कमाईबद्दल सांगायचे झाले तर, शनिवारी या चित्रपटाने ३१ कोटी आणि रविवारी ३६ कोटींची कमाई केली होती. त्याच सोमवारी या चित्रपटाने १६.२५ कोटी आणि मंगळवारी १४.४ कोटी रुपयांची कमाई केली होती. बुधवारी चित्रपटाच्या व्यवसायात थोडीशी घसरण झाली. Sacnilk च्या प्राथमिक माहितीनुसार, जवानाने २० सप्टेंबर रोजी देशभरात सुमारे १० कोटी रुपयांची कमाई केली. यासह, १४ दिवसांत जवानने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे ५१८.२८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

'जवान'चे आतापर्यंतचे कलेक्शन -

१ दिवस- ७५ कोटी

२ दिवस- ५३.२३ कोटी

३ दिवस- ७७.८३ कोटी

४ दिवस- ८०.१० कोटी

५ दिवस- ३२.९२ कोटी

६ दिवस- २६.५२ कोटी

७ दिवस- २३.८३ कोटी

८ दिवस- २१.९० कोटी

९ दिवस- १९.१० कोटी

१० दिवस- ३२.३० कोटी

११ दिवस- ३७.२६ कोटी

१२ दिवस- १६.२५ कोटी

१३ दिवस- १४.८० कोटी

१४ दिवस- १० कोटी

एकूण कमाई - ५१८.२८ कोटी

दरम्यान, शाहरुख खानचा पठान चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. त्यानंतर गदर चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जवान चित्रपट सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाहुबली २ चित्रपट चौथ्या आणि केजीएफ २ शेवटच्या क्रमांकावर आहे.

पठाण- ५४३.०५ कोटी

गदर २- ५२० कोटी

जवान - ५१८.२८ कोटी

बाहुबली २- ५१०.९९ कोटी

केजीएफ २- ४३४.७० कोटी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT