Salman Khan Blackbuck Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला माफ करायला बिश्नोई समाज तयार, पण समोर ठेवली मोठी अट

Chetan Bodke

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोन अज्ञातांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी सध्या गुन्हे शाखेने सहा जणांना ताब्यात घेतले आहे. सलमान खानने १९९८ मध्ये काळवीट शिकार केल्यापासून बिष्णोई समाजाच्या हिट लिस्टवर आहे. अनेकदा अभिनेत्याला बिष्णोई समाजाकडून धमकीचे फोन, मेसेजेस आणि इमेलही मिळाले आहेत.

नुकतंच रविवारी सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने बिष्णोई गँगची माफी मागितली होती. तिने बिष्णोई गँगकडे सलमानला माफ करण्याची विनंती केली होती. पण आता बिष्णोई समाजाने सोमी अलीचा माफीनामा नाकारला आहे. सोमीने नाही तर सलमानने बिष्णोई समाजाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केलेली आहे.

१९९८ मध्ये सलमान खानने एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान काळवीट शिकार केलेली होती. तेव्हापासून अभिनेता या प्रकरणामुळे बिष्णोई समाजाच्या हिट लिस्टवर आहे. रविवारी सोमीने बिष्णोई समाजाची माफीही मागितली होती, पण तिने मागितलेली माफी त्यांना महत्त्वाची नाही. अखिल भारतीय बिश्नोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडियाने सांगितले की, २७ वर्षे जुन्या या प्रकरणी सलमान खानने त्या जुन्या प्रकरणात माफी मागितली तर सर्व गोष्टींवर तोडगा निघू शकतो. तर समाजातील महत्वाचे व्यक्ती या प्रकरणी निर्णय घेणार आहेत.

सलमान खानने येऊन आपली चूक मान्य करून माफी मागितली तर त्याला माफ करता येईल, असे म्हटले आहे. बिष्णोई समाजाचे एकूण २९ नियम आहेत. त्यापैकी १० व्या नियमांत तरतूद आहे. सलमान खानने बिश्नोई समाजानुसार असे केले तर त्याला माफ केले जाईल. लॉरेन्स बिश्नोईने एका मुलाखतीदरम्यान असेच म्हटले होते की, जर सलमान खानने बिश्नोई समाजाच्या मंदिरात येऊन माफी मागितली तर त्याला पूर्णपणे माफ केले जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT