Salman Khan Upcoming Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan आणि AR Mugugadoss 2025 च्या ईदला धमाका करणार, नेमकी काय घोषणा केली?

Priya More

Salman Khan:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार सलमान खान Salman Khan) सध्या चर्चेत आला आहे. २०२३ मध्ये सलमान खान टायगर ३ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. २०२४ मध्ये देखील तो अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशामध्ये सलमान खानने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषण केली आहे. सलमान खानचा हा चित्रपट (Salman Khan Movie) २०२५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

सलमान खानच्या नव्या चित्रपटाची नुकताच घोषणा करण्यात आली आहे. स्वत: सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्याच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एआर मुरुगदास यांच्याकडे असणार आहे. सलमान खान आणि एआर मुरुगदास हे पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र काम करणार आहेत. सध्या सलमान खानच्या नव्या चित्रपटाची घोषणा होताच चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. सोशल मीडियावर सध्या ते उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.

सलमान खानने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करून आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने साजिद नाडियादवाला आणि एआर मुरुगादॉस यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केलाय. सलमान खानने या पोस्टमध्ये लिहिले की, 'अतिशय प्रतिभावान एआर मुरुगादास आणि माझा मित्र साजिद नाडियादवाला यांच्यासोबत एका अतिशय रोमांचक चित्रपटात जोडून आनंद झाला. हे सहकार्य विशेष आहे आणि तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी हा प्रवास सुरू करत आहे.' पुढील वर्षी ईद २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या पोस्टवर सलमान खानचे चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे, '१००० कोटींचा चित्रपट येतोय.' आणखी एका चाहत्याने लिहिले आहे, '२०२५ हे सलमान खानचे वर्ष असेल.'

सलमान खानने नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असली तरी या चित्रपटाचे टायटल जाहीर केले नाही. मात्र, हा चित्रपट 'किक' 'किक २'चा सिक्वेल असेल असा अंदाज सलमान खानचे चाहते व्यक्त करत आहेत. सलमान खानचा 'किक' हा चित्रपट साजिद नाडियाडवालाने दिग्दर्शित केला होता आणि त्याची निर्मितीही केली होती. साजिद नाडियादवाला देखील सलमान खानच्या नवीन चित्रपटाची निर्मिती करत आहे पण दिग्दर्शनाची जबाबदारी ए.आर. मुरुगदास यांच्याकडे आहे. सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सलमान खानकडे 'द बुल', 'प्रेम की शादी', 'टायगर वर्सेस पठान', 'बजरंगी भाईजान 2', 'शेर खान' असे अनेक चित्रपट आहेत. सलमानच्या या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT