Shambhu Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shambhu Song: अभिनेत्यानंतर आता सिंगर झाला अक्षय कुमार, खिलाडीने गायलेलं 'शंभू' गाणं रिलीज

Akshay Kumar Shambhu Song: अक्षय कुमार आता अभिनयासोबतच गायनामध्ये देखील आपला हात आजमावत आहे. नुकताच अक्षय कुमारचा 'शंभू' हा म्युझिक व्हिडीओ (Shambhu Song) रिलीज करण्यात आला आहे.

Priya More

Akshay Kumar:

बॉलिवूडचा (Bollywood) 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या चित्रपट आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. दमदार अभिनय, अॅक्शनपासून कॉमेडीपर्यंत अक्षय कुमारची स्टाइल त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. त्याचे चित्रपट हे सुपरहिट देखील होतात. 56 वर्षांचा अक्षय कुमार आजही खूपच फिट असून तो बॉलिवूडच्या नवीन अभिनेत्यांना टक्कर देतो. अक्षय कुमार आता अभिनयासोबतच गायनामध्ये देखील आपला हात आजमावत आहे. नुकताच अक्षय कुमारचा 'शंभू' हा म्युझिक व्हिडीओ (Shambhu Song) रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार महादेवाच्या अवतारामध्ये दिसत आहे.

अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी 'शंभू' चित्रपटाचा टीझर शेअर करत त्याच्या रिलीजची माहिती दिली. आता हे गाणे ५ फेब्रुवारीला म्हणजे आज रिलीज करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे 'शंभू' या गाण्याला अक्षय कुमारने आवाज दिला आहे. यासोबतच त्याने व्हिडिओमध्ये परफॉर्मन्सही केला आहे. 'शंभू'च्या व्हिडिओमध्ये अक्षय 'OMG 2' चित्रपटातील लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात त्याने शिवाच्या दूताची भूमिका साकारली होती. शंभू गाण्यातील अक्षय कुमारचा लूक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

'शंभू' हे गाणे अक्षय कुमारने सुधीर यदुवंशी आणि विक्रम मॉन्ट्रोजसोबत गायले आहे. गाण्याचे बोल अभिनव शेखर यांनी लिहिले आहे. तर कोरिओग्राफीची जबाबदारी गणेश आचार्य यांनी घेतली आहे. अक्षय कुमारचे हे गाणं रिलीज होताच त्याला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचसोबत या गाण्याला त्याच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. हे गाणं युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच तो 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ॲक्शन करताना दिसणार आहेत. अक्षय कुमारने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्याची माहिती देखील समोर येत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त अक्षय कुमारकडे 'हाऊसफुल 5', 'राउडी राठोड 2', 'वेलकम 3' आणि 'स्काय फोर्स'सह अनेक चित्रपट आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महानगर गॅसच्या कार्यालयात गोंधळ; वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक, अधिकाऱ्यांना दिला काळं फासण्याचा इशारा

रक्ताने माखले, स्ट्रेचरवरून खाली पडले; भाजपच्या महामंत्र्याचा जागेवर मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

Maharashtra Live News Update: नाशिकच्या मालेगावमध्ये आज पुन्हा तापमानात वाढ

PM Kisan Yojan: उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; कारण काय?

वा रं मास्तर! सहावीच्या विद्यार्थिनींना दिलं दहावीचे पेपर तपासण्याचं काम; Video Viral

SCROLL FOR NEXT