बॉलिवूडचा (Bollywood) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेच अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरेच्या (Nupur Shikhare) लग्नाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.
आतापर्यंत या कपलच्या लग्नाच्या तारखेबाबत फक्त चर्चा होत होत्या. पण आता आयराच्या लग्नाची कन्फर्म तारीख समोर आली आहे. स्वत: आमिर खाननेच आपल्या मुलीच्या लग्नाविषयी प्रत्येक गोष्ट शेअर केली आहे. त्याने लग्नाची तारीख देखील सर्वांना सांगितली आहे.
आयरा खानने बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला नसला तरी देखील ती कायम चर्चेत असते. आयरा खान सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. आयराचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. आयरा तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचदा ती तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चांगलीच चर्चेत राहते. आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) विवाहबंधनात अडकणार आहे. स्वत: आमिर खानने आपल्या मुलीच्या लग्नाची तारीख उघड केली आहे.
आमिर खान एका लाईव्ह सेशनमध्ये अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने बोलला. मानसिक आरोग्य, करिअर आणि कुटुंबाविषयी बोलताना आमिर खानन आपल्या मुलीच्या लग्नाविषयी सांगितले. आयरा आणि नुपूर पुढच्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत. ३ जानेवारीला आयरा आणि नुपूर लग्नगाठ बांधतील, असे आमिरने सांगितले. आयरा २६ वर्षांची आहे आणि ती बऱ्याच दिवसांपासून फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघांची एंगेजमेंट झाली होती. यावेळी दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे फ्रेंड्स हजर होते. एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.
आयरा आणि नुपूरच्या लग्नाबद्दल आमिर खान सर्वाधिक उत्सुक आहे. सासरा होणारा आमिर खान आयराच्या प्रत्येक निर्णयावर खूश आहे. त्याला नुपूर खूप आवडतो. आमिरने लाईव्ह सेशनमध्ये सांगितले की, जेव्हा आयरा डिप्रेशनमध्ये होती तेव्हा नुपूर तिच्यासोबत होता आणि त्याने आयराला खूप चांगले हाताळले. नूपुरने प्रत्येक परिस्थितीत आयराच्या पाठीशी उभे राहून तिला भावनिक आधार दिला.
आमिरने यावेळी असे देखल सांगितले की, 'मुलगी आयराला सासरी पाठवताना मला खूप रडायला येईल. कारण तो दिवस माझ्यासाठी खूपच भाविक असेल.' उघड केलेली आणखी एक गोष्ट म्हणजे त्याच्या मुलीच्या निरोपाच्या वेळी तो खूप रडणार होता. दरम्यान, आयरा आणि नुपूर लॉकडाऊन दरम्यान एकमेकांच्या जास्त जवळ आले. आयरा तिच्या मानसिक आरोग्याबद्दल अनेकदा बोलली आहे. ती देखील डिप्रेशनच्या टप्प्यातून गेली होती. त्यावेळी नुपूर शिखरेने तिला त्या वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.