Aamir Khan Son In Law Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ira Khan Wedding: कोण आहे आमिर खानचा होणारा जावई, तो नेमका काय करतो?

Priya More

Ira Khan And Nupur Shikhare Wedding:

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी मुलगी आयरा खान (Ira Khan) आज विवाहबंधनात अडकणार आहे. आयरा आज शिखरेंची सून होणार आहे. आयरा खान आज नुपूर शिखरेसोबत लग्न (Ira Khan And Nupur Shikhare Wedding) करणार आहे. तिच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. अशामध्ये आमिर खानच्या होणाऱ्या जावयाबद्दल त्याच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे की ऐवढ्या मोठ्या सुपरस्टारची मुलगी आयरा जिम ट्रेनरशी का लग्न करतेय? त्याचसोबत, आयराचा होणारा नवरा कोण आहे?, आयराच्या होणारा नवऱ्याचा उत्पन्नाचा स्रोत काय आहे? अशाप्रकारचे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत. त्यांच्या या प्रश्नांची उत्तर आज आम्ही देणार आहोत...

नुपूर शिखरे आणि आयरा खान 3 जानेवारीला कोर्टात लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मंगळवारी रात्री उशिरा आमिर खानचा बेस्ट फ्रेंड सलमान खानच्या घरी आयराचे मेहंदी फंक्शन पार पडले. किरण राव आपला मुलगा आझादसोबत या कार्यक्रमात पोहोचली होती. 2 जानेवारीपासून आयरा आणि नुपूरच्या लग्नापूर्वीचे विधी सुरू होते. त्यांच्या हळदीचे, मेहंदीच्या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले होते. अखेर आज हे कपल विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे दोघांच्याही घरी आनंदाचे वातावरण आहे.

इरा खानचा होणारा नवरा आणि आमिर खानचा होणारा जावई नुपूर शिखरे ही सामान्य व्यक्ती नसून एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेनकडे तो बराच काळ फिटनेस ट्रेनर होता. तो आमिर खानचा देखील फिटनेस ट्रेनर होता. याशिवाय नुपूर फिटनेस एक्स्पर्ट आणि कन्सल्टंट देखील आहे. ज्यातून तो मोठी कमाई करतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तो मूळचा पुण्याचा रहिवासी आहे आणि त्याने मुंबईतून ग्रॅज्युएशन केले आहे. नुपूर शिखरेचे नेटवर्थ 8.2 कोटी इतके आहे.

नुपूर आणि आयराची यांची पहिली भेट जिममध्येच झाली होती. नुपूरने आयराला देखील फिटनेस ट्रेनिंग दिले आहे. याचदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 2020 पासून आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही सोशल मीडियावर नेहमी एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करतात. एकमेकांसोबतचे मजेशीर फोटो आणि व्हिडीओ ते शेअर करत असतात. 18 नोव्हेंबर 2023 ला या कपलने साखरपुडा केला होता. दोघांनी कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. आता हे कपल विवाहबंधनात अडकणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

SCROLL FOR NEXT