Ira Khan- Nupur Shikhare Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ira Khan- Nupur Shikhare Wedding: नुपूर शिखरेची बायको झाली आयरा खान, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

Ira Khan- Nupur Shikhare Marriage: या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर कमेंट्स करत दोघांचेही चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Priya More

Ira Khan And Nupur Shikhare Wedding Video:

बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर 'परफेक्शनिस्ट' अर्थात अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी मुलगी आयरा खान (Ira Khan) अखेर आज विवाहबंधनात अडकली. आयरा खान (Ira Khan) तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये कोर्ट मॅरेज केले. आयरा आणि नुपूरच्या लग्नाला दोघांच्या कुटुंबातील जवळचे व्यक्ती आणि मित्र परिवाराने हजेरी लावली. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर कमेंट्स करत दोघांचेही चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

आयरा खान आणि नुपूर शिखरे लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत होते. आयराने लाइट पिंक कलरचा शरारा परिधान केला होता. नववधू्च्या रुपामध्ये आयरा खूपच क्युट दिसत होती. तर नुपूरने डार्क ब्लू कलरची शेरवानी परिधान केली होती. यामध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. या कपलचा लग्नातला लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे. पण नुपूर शिखरे लग्नाला टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये पोहचला. नुपूर शिखरे लग्नाच्या ठिकाणी रनिंग करत करत पोहचला. त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

लग्नानंतर आयरा आणि नुपूरने एकमेकांच्या कुटुंबासोबत फोटोसेशनही केले. आपल्या मुलीच्या लग्नात आमिर खानचा लूक देखील खूपच जबरदस्त होता. आमिर खानने व्हाइट कलरचा कुर्ता आणि धोतर तसंच डोक्यावर पिंक कलरचा फेटा घालला होता. आमिर खानच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय रीना दत्ता आणि आमिर खानही लग्नात एकत्र उभे राहिल्याचे फोटोंमध्ये पाहायला मिळाले. मुलगी आयराच्या लग्नात रीना दत्ताने ब्लू कलरचा लाँग सूट परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि आनंदी दिसत होती. तिचा लूकही खूप पसंत केला जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाची नोंदणी केल्यानंतर हे कपल 8 जानेवारीला उदयपूरमध्ये महाराष्ट्रीय रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. आयरा आणि नुपूर यांनी आज मुंबईतील हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या लग्नाची नोंदणी केली. आमिर खानची एक्स वाइक किरण राव देखील त्यांचा मुलगा आझादसोबत आयरा आणि नुपूरच्या लग्नात सहभागी झाली होती. व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये आमिर खान किरण राववर प्रेमाचा वर्षाव करताना दिसला. त्याने सर्वांसमोर किरणच्या गालावर किस केले. किरण रावने ग्रीन कलरचा ड्रेस परिधान केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT