List of OTT Released This Week Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Released This Week : ‘चंदू चैंपियन’ ते ‘द बॉयज ४’.... या आठवड्यात थिएटरमध्ये आणि ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी

OTT Released This Week Web Series : प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर मराठी, हिंदीसह वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट रिलीज होत असतात.

Chetan Bodke

प्रत्येक आठवड्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपट रिलीज होत असतात. प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर मराठी, हिंदीसह वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट रिलीज होत असतात. अशातच या ही शुक्रवारीही वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट रिलीज होणार आहेत, जाणून घेऊया त्या चित्रपटांविषयी आणि वेबसीरीजविषयी...

Kartik Aaryan Movie Chandu Champion

चंदु चॅम्पियन (Chandu Champion)

कार्तिक आर्यन स्टारर 'चंदु चॅम्पियन' चित्रपट येत्या १४ जूनला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झालेली आहे. या स्पोर्ट्स ॲक्शन चित्रपटामध्ये, कार्तिक आर्यनचा एक हटके लूक पाहायला मिळणार आहे.

लव्ह की अरेंज मॅरेज (Luv Ki Arrange Marriage)

अवनीत कौरचा 'लव्ह की अरेंज मॅरेज' चित्रपट येत्या १४ जून २०२४ रोजी झी ५ (Zee 5) ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. अवनीत कौर आणि सनी सिंह या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचे दिग्दर्शक इशरत आर खान आहे.

The Boys- Season 4

द बॉयज सीझन 4 (The Boys- Season 4)

'द बॉयज सीझन 4' ही सीरिज येत्या १३ जून २०२४ रोजी ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. १३ जूनला या सीरीजचे ३ एपिसोड रिलीज होणार आहेत. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला एक- एक एपिसोड रिलीज होणार आहे.

यक्षिणी (Yakshini)

या आठवड्यात ॲक्शन, स्पोर्ट्स, कोर्ट ड्रामा असलेली 'यक्षिणी' वेब सीरिज ही पाहायला मिळणार आहे. ही एक तेलुगु वेब सीरिज आहे, जी हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि मराठी भाषेत रिलीज होणार आहे. तुम्ही ही सीरिज १४ जूनपासून 'डिस्ने प्लस हॉटस्टार'वर पाहू शकता.

Maharaja Web Series

महाराज (Maharaj)

या सीरीजच्या माध्यमातून आमिर खानचा मुलगा जुनैद खान सिने इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करतोय. ही सीरीज १४ जून २०२४ रोजी नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मल्होत्रा पी. सिद्धार्थने या सीरीजचे दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

Numb hands after waking up: रात्री झोपेत हाताला मुंग्या येतात? दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या यामागील कारणं

Rain Alert : महाराष्ट्रात कुठे उन्हाचा कडाका, तर कुठे धो धो पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Churma Laddoo Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली आहे? मग घरच्या घरी तयार करा टेस्टी चूरमा लाडू

Kachya Kelichi Bhaji Recipe : हिरव्यागार कच्च्या केळीची चटपटीत भाजी, मुलं पुन्हा पुन्हा मागून खातील

SCROLL FOR NEXT