Vampire Movie canva
मनोरंजन बातम्या

Vampire Movie: सरकट्यानंतर बॉक्स ऑफिसवर वैम्पायरची दहशत; शूटींगला लवकरच होणार सुरुवात

Vampire Movie Shooting New Update: 'स्त्री २' चित्रपटाचे दिग्दर्शक अमक कौशिक यांचा 'भेड़िया २' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा यांच्या स्त्री २ ने बॉक्स ऑफिसवर सूपर हिट ठरलाय आहे. चित्रपटाला मिळालेल्या मोठ्या यशामुळे दिग्दर्शक अमर कौशिक खूप खूश असून त्यांनी चित्रपटामधील कलाकारांचे कौतुक केलंय. स्त्री २ च्या यशानंतर दिग्दर्शक अमर कौशिक याने त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. दिग्दर्शक अमर कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा नवा चित्रपट 'भेड़िया २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'भेड़िया २' या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता वरुन धवन मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे लेखन आणि कथा फायनल झाली आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक अमर कौशिक याच्या 'वैम्पायर' चित्रपटाच्या शुटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना मुख्य भूमिका साकारताना दिसण्याची शक्यता आहे. इंडिया टूडेसोबत झालेल्या मुलाखाती दरम्यान अमर कौशिक यांनी 'भेड़िया २' या चित्रपटाबद्दल मोठा खुलासा केला. कौशिक यांनी सांगितले की, 'भेड़िया २' या चित्रपटाची कथा सध्या पूर्ण झाली नाहीये. अजून मला माझ्या टीमसोबत चित्रपटाच्या स्क्रिन प्लेवर देखील भरपूर काम करायचे आहे.

जेव्हा अमर कौशिकला त्याच्या 'वैम्पायर' चित्रपटाबद्दल विचारल्यानंतर त्याने सांगितले की, पुढील २ ते ३ महिन्यांमध्ये 'वैम्पायर' या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. 'स्त्री २' नंतर आता 'भेडीया २' देखील बॉक्स ऑफिसची बेस्ट हॉरर कॉमेडी चित्रपट ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय. 'भेडीया २' या चित्रपटामध्ये वरुण धवन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. भेडीया २' या चित्रपटामध्ये वरुणसोबत पुन्हा कृती सेनन दिसू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

अमर कोशिकच्या 'स्त्री २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. 'स्त्री २' मधील कलाकारांच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. चित्रपटाने २० दिवसांमध्ये ५५.०५ कोटींची कमाई केली आहे. स्त्री २ चित्रपटामधील श्रद्धा आणि राजकुमारच्या जोडीला चाहत्यांनी भरपूर पसंती दिली आहे. चित्रपटामधील 'आज की रात' हे गाण सध्या सर्वत्र व्हारल होताना दिसत आहे.

Edited By: Nirmiti Rasal.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

Property Registration : महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस! अवघ्या ५ महिन्यांत कमावले हजारो कोटी

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

SCROLL FOR NEXT