milind soman Saam Tv
मनोरंजन बातम्या

Milind Soman: मिलिंदने डिश वॉशची केली जाहिरात;'विम ब्लॅक'वरुन मॉडेलवर टीकास्र

मिलिंद सोमण सध्या एका जाहिरातीमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

Chetan Bodke

Milind Soman: सुपरमॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण हा आजही आपल्या खास बॉडीशैलीने चर्चेत असतो. वयाच्या ५७ व्या वर्षीही मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो. तसेच त्याच्या वर्कआउट्सचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मिलिंद सोमण सध्या एका जाहिरातीमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. मिलिंदने खास पुरुषांसाठी भांडी घासण्याच्या साबणाची जाहिरात सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मिलिंद सोमणच्या या जाहिरातीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओत मिलिंद एका मुलाला 'विम ब्लॅक' या नव्या डिश वॉशची माहिती देत त्याला टोमणेही मारत आहे. जिममधील एका मुलगा त्याच्या सहकाऱ्यांना भांडी घासण्यासाठी सांगत असतो. या जाहिरातीमुळे ट्रोलर्सनी मिलिंदवर चांगलाच निशाणा साधला आहे.

ही जाहिरात शेअर करत मिलिंदने कॅप्शन लिहिले आहे की, "पुरुषांसाठी खास भांडी धुण्याचा साबण आला आहे 'विम ब्लॅक'." पुरुषांनी महिलांना घरकामात मदत करावी हा उद्देश सर्वत्र लक्षात घेत या प्रॉडक्टची निर्मिती करण्यात आली आहे. एकीकडे याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे तर दुसरीकडे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

मिलिंद सोमनने ही जाहिरात निवडल्या बद्दल त्याच्यावर चाहते भलतेच नाराज आहेत. भांडी घासण्यासाठी स्री, पुरुष दुजाभाव का? प्रोडक्टला फक्त ब्लॅक नाव दिल्याने ते पुरुषांसाठी होते का ? मिलिंद सोमण अशाचा जाहिराती करणार असा टोला यावेळी ट्रोलर्सनी दिला आहे. यावेळी मिलिंदवर लिंगभेद केल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT