Shahrukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: किंग खान 'डंकी'च्या शुटिंगसाठी जेद्दाहमध्ये, यादरम्यान चाहत्यासोबत शेअर केला खास व्हिडिओ

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आगामी वर्षात 'पठाण' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shahrukh Khan: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आगामी वर्षात 'पठाण' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. सोबतच शाहरुखचा 'पठाण' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 'जवान' आणि 'डंकी' हे चित्रपटही त्याचे पुढच्या वर्षी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहरुखने काही दिवसांपूर्वी राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' चित्रपटाचे शूटिंग जेद्दाह, सौदी अरेबिया येथे सुरु झाल्याचे सांगितले.

शाहरुखचे चाहते हे फक्त भारतातच नाहीत.तर परदेशात ही आहेत. 'डंकी' चित्रपटानिमित्त शाहरुख परदेशात आहे. शूटिंगच्या ठिकाणी आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी सर्वच चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. त्यावेळी शाहरुखच्या सेटवर एकच गर्दी झाली होती. चित्रपटाच्या सेटवरील शाहरुखचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या पोस्ट्सवर चाहतेही उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडियावर शाहरुखच्या चाहत्याने सेटवरील एक फोटो शेअर करत लिहिले की, 'जेद्दाहमध्ये शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खूप सुरक्षा होती. फोटो आणि व्हिडीओ बनवायला अजिबात परवानगी नव्हती. चित्रपटातील आशय हा बराच नवा असल्याने हा चित्रपट नक्कीच प्रचंड हिट होणार आहे. शाहरुख तुला चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा.'

त्याचवेळी आणखी एका यूजरने शाहरुख सुपर मार्केटमध्ये खरेदी करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख चॉकलेटी रंगाचा जॅकेट आणि काळ्या रंगाच्या पँटमध्ये दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर करताना त्या व्यक्तीने ट्विटरवर लिहिले की, 'शाहरुख खानचा लेटेस्ट व्हिडिओ…'

किंग खानचा 'डंकी' चित्रपट आगामी वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिरानी आणि शाहरुख पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. सर्व चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राजू हिराणी यांनी आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

Kidney : किडनी निकामी होण्याआधी सकाळी दिसतात ही ४ लक्षणं, दुर्लक्ष करू नका अन्यथा...

समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, मुंबईला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

LPG Connection: LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, ३० जूननंतर कट होणार गॅस कनेक्शन; आजच करा हे काम

SCROLL FOR NEXT