Dunki 1st Day Box Office Collection Instagram
मनोरंजन बातम्या

Dunki 1st Day Collection: शाहरुखच्या ‘डंकी’ला पहिल्या दिवशी प्रेक्षकांकडून दिलासादायक प्रतिसाद, ‘पठान’ आणि ‘जवान’च्या तुलनेत कमाई किती?

Dunki Box Office Collection: ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर काल (२१ डिसेंबर) रिलीज झाला असून चित्रपटाने पहिल्या दिवशी दिलासादायक कमाई केली आहे.

Chetan Bodke

Dunki 1st Day Box Office Collection

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष खूप खास ठरले आहे. चाहत्यांना या वर्षामध्ये दोन हिट चित्रपट दिल्यानंतर त्याचा तिसरा बहुप्रतिक्षित ‘डंकी’ चित्रपट सुद्धा रिलीज झाला आहे. ‘डंकी’ चित्रपटाची प्रेक्षकांना गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर काल (२१ डिसेंबर) रिलीज झाला असून चित्रपटाने पहिल्या दिवशी दिलासादायक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने किती कोटींची कमाई केली आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

Sacnilk ने दिलेल्या आकड्यांनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचा एकूण खर्च १२० कोटी इतका झाला असून प्रेक्षक चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. २२ डिसेंबरला ‘डंकी’सोबत प्रभासचा ‘सालार’ चित्रपटही रिलीज झाला आहे. दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करतात?, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘जवान’ आणि ‘पठान’च्या पहिल्या दिवसाची कमाई पाहता, ‘डंकी’ला तशी कमाई करता आली नाही. ‘पठान’ने पहिल्या दिवशी ५७ कोटी तर, ‘जवान’ने पहिल्या दिवशी ७५ कोटींचा आकडा गाठला होता. या दोन्ही चित्रपटांच्या कमाईचा आकडा पाहता ‘डंकी’ला तशी कमाई करणं जमलेलं नाही. ‘डंकी’ला ॲडव्हान्स बुकिंगमध्येही खास चांगला प्रतिसाद मिळालेला नव्हता. या दोघांमध्ये ही सर्वाधिक कमाई कोण करतं, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. (Bollywood Film)

‘डंकी’ चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार हिराणी आणि शाहरुख खान हे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘डंकी’मध्ये प्रमुख भूमिकेत शाहरुख खानसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT