Karan Johar Airport Video Trolled Instagram
मनोरंजन बातम्या

Karan Johar Trolled: ‘ए रमतगमत कुठे चाललाय?...’ विमानतळावर डॉक्युमेंट न दाखवणाऱ्या करणवर नेटकरी संतापले

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. सध्या त्याला त्याच्या एका कृत्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

Chetan Bodke

Karan Johar Airport Video: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. करण नेहमीच सोशल मीडियावर या ना त्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा त्याच्या कृत्यामुळे सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे. सध्या करणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये, करण विमानतळावर फार घाईत जात होता, सिक्युरिटीसमोर तपासून न दिल्यामुळे सोशल मीडियावर करण चांगलाच चर्चेत आला आहे.

अलीकडेच करण जोहरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, करण क्षणाचाही विलंब न लावता विमानतळाच्या आत जाताना दिसत आहे. पण तेव्हाच विमानतळावर उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले, कारण करण कागदपत्रांची पडताळणी न करता विमानतळावर एंट्री घेत होता. या कारणावरून नेटिझन्सनी आता करण जोहरला ट्रोल केले आहे.

करणचा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करणाऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘ए कुठे चाललाय? इकडे ये. ते इंटरनॅशनल एयरपोर्ट आहे, इकडे ये, कुठं चालला तोंड वर करुन. डॉक्युमेंटची तपासणी न करता करण तू कसा काय जातो?’ तर आणखी एक नेटकरी म्हणतो, ‘विमानतळावर कॅटवॉक करताना करण पेपर दाखवायला विसरला.’ अशा प्रकारे अनेक नेटकऱ्यांनी करण जोहरची खिल्ली उडवली.

करण जोहरच्या चित्रपटाबद्दल बोलायचे तर, निर्माता म्हणून करणच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आहे. करण जोहरच्या या चित्रपटात सुपरस्टार रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. धर्मा प्रोडक्शन निर्मित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ 28 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT