Vidya Balan Vs Madhuri Dixit Dance on Aami Je Tomar Song From Bhool Bhulaiyaa 3 Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aami Je Tomar Song: 'आमी जे तोमर'मध्ये विद्या बालन आणि माधुरी दीक्षितची जुगलबंदी पाहायला मिळणार, ‘भुल भुलैय्या ३’साठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Bhool Bhulaiyaa 3 Movie's Aami Je Tomar Song: मिळालेल्या माहितीनुसार, ‘आमी जे तोमार’ या गाण्यामध्ये अभिनेत्री विद्या बालनसोबत बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितही दिसणार आहे.

Chetan Bodke

Bhool Bhulaiyaa 3 Movie Song

२००७ मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या ‘भुल भुलैय्या’ चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला आणि दुसऱ्या भागाला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

चित्रपटाच्या तिसऱ्या भागात विद्या बालनसोबत, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षितही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार, ‘आमी जे तोमार’ या गाण्यामध्ये अभिनेत्री विद्या बालनसोबत बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितही दिसणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. चित्रपटाची शूटिंग कोलकात्यात सुरू आहे. चित्रपटात विद्या बालन पुन्हा एकदा 'मंजुलिका'च्या भूमिकेत दिसणार आहे. तिसऱ्या भागात तिच्यासोबत बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितही दिसणार आहे. या दोघीही ‘आमी जे तोमार’ या गाण्यामध्ये दिसणार आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या दोघीही ‘आमी जे तोमार’ या गाण्यामध्ये प्रमुख भूमिकेत असतील. त्यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत, कार्तिक आर्यनही दिसण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर, दोघींच्याही डान्सची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. कोणाचा डान्स सर्वाधिक उत्तम होणार ? याचं उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळेल.

निर्माते ‘आमी जे तोमार’ या गाण्याचे नवीन व्हर्जन रिलीज करणार असल्याची शक्यता आहे. कार्तिक आर्यनने नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. अभिनेत्याने काही दिवसांपूर्वी कोलकात्यातील हावडा ब्रिजवर एक सीन शूट करत असतानाचा एक फोटो शेअर केलेला आहे. अभिनेत्याला तिथे शूटिंग करताना पाहून पुलावर मोठी गर्दी झाली होती. हा चित्रपट २०२४मध्येच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. चित्रपटामध्ये तृप्ती डिमरी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काही युजर्सच्या मते, माधुरी डान्समध्ये विद्याला मागे टाकू शकते. मात्र, कोण कोणावर मात करेल, हे या दिवाळीत, चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton Sarees Design: उन्हाळ्यात स्टायलिश दिसायचंय? मग ट्राय करा या 9 प्रकारच्या कॉटन साड्या

उजनीचं धरण ठरतंय कॅन्सरचं कारण? सोलापुरात दररोज कॅन्सरचे ६० रूग्ण?

Maharashtra Live News Update : विजयदुर्ग ते मुंबई रो-रो जलवाहतूक बोट मुंबईकडे रवाना

Zumba Benefits: वजन कमी करण्यासाठी योगा किंवा एक्सरसाइजपेक्षा छान गाण्यावर करा झुंबा, मिळतील 'हे' फायदे

Friday Horoscope: नव्या संधीमुळे दिवस उत्साहात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींची चांदीच चांदी होणार; वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT