Pathaan OTT Release Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan: 'पठान'मधला 'तो' प्रसंग सिनेमातून काढला पण, आता OTT वर दिसणार, दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'पठान' चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे.

Chetan Bodke

Pathaan OTT Release: सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान' सध्या भारतातच जगभरात चित्रपटाचा गाजावाजा होत आहे. चित्रपटाने आतापर्यंत भारतात ५०० कोटींचा पल्ला पार केला असून जगभरात ही या चित्रपटाने १००० कोटींचा पल्ला पार केला आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे.

बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्यानंतर सर्वच चित्रपटाची ओटीटी प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची ओटीटी प्रदर्शनाबद्दल अधिकृत घोषणा केली नसली तरी ‘पठान’ प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे सर्वांनाच माहीत आहे. हा चित्रपट ज्यांनी चित्रपटगृहात पाहिला त्यांच्यासाठी ओटीटीवर एक खास सरप्राईज असणार आहे, असे खुद्द दिग्दर्शकांनी सांगितलं आहे.

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक म्हणतात, " 'पठान'ला काहीच नाव नाही. शिवाय तो एका चित्रपटगृहात सापडला होता ज्याचं नाव होतं ‘नवरंग’. तो 'पठान' कसा झाला हे सर्व आम्हाला एडिटिंग मध्ये काढावं लागलं होतं. कदाचित तो सर्व भाग प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे."

सिद्धार्थ यांनी याबद्दल निश्चित माहिती दिली नसली तरी ‘पठान’च्या ओटीटी व्हर्जनमध्ये अशा बऱ्याच वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. शाहरुखचे चाहते यासाठी चांगलेच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

INDIA Alliance Protest: विरोधकांच्या मोर्चादरम्यान महिला खासदार बॅरिगेट्सवर चढल्या, घोषणाबाजी करताना दोघी चक्कर येऊन पडल्या

Radhakrishna Vikhe Patil : केवळ आरोप करून आरक्षण मिळणार आहे का? मंत्री विखे पाटील यांचा जरांगे पाटील यांना सवाल

Dashavatara: बाप-मुलाच्या धमाल नात्याची झलक 'आवशीचो घो'मध्ये; 'दशावतार'मधील पहिलं गाणं प्रदर्शित

Women's World cup 2025: क्रिकेट वर्ल्डकपचं काउंटडाऊन सुरु! ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा कर्णधार हरमनप्रीत कौरचा निर्धार

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सरकारमधील कलंकित मंत्र्याची हकालपट्टी करा; ठाकरे गटाकडून जन आक्रोश आंदोलन

SCROLL FOR NEXT