Malaika Arora and Arjun Kapoor Wedding News  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora: खरंच की काय ? मलायकाचं दुसरं लग्न ? साखरपुड्याबद्दलचं 'ते' ट्विट चर्चेत

सध्या एका ट्विटमुळे मलायकाच्या साखरपुडा आणि लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Chetan Bodke

Malaika Arora And Arjun Kapoor Wedding: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या फॅशन सेन्सने सोशल मीडियावर चर्चेत असते. सोबतच तिचा नवा कार्यक्रम म्हणजे 'मुविंग इन विथ मलायका ' मुळे ती बरीच चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसंपासून मलायका आणि अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र होत आहे. सध्या एका ट्विटमुळे त्या दोघांच्या ही साखरपुडा आणि लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मलायका आणि अरबाज खान यांनी १९९८ साली लग्नगाठ बांधली होती. पण त्यांच्या नात्यात काही कारणामुळे दुरावा आल्याने २०१७ साली एकमेकांपासून वेगळं होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. तेव्हा पासून ती सिंगलच आहे. २०१९ पासून मलायका अर्जुन कपूर एकमेकांना डेट करताय. त्यावरुन त्या जोडीला अनेकदा ट्रोलही करण्यात आले आहे. सोबतच ते लग्न करणार नाही अशी बातमी देखील काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण आता मिळालेल्या माहितीनुसार ते लवकरच साखरपुडा आटोपणार असल्याची चर्चा होत आहे.

एका ट्रेड एक्सपर्टने मलायका आणि अर्जुन लवकरच साखरपुडा करणार असल्याची बातमी शेअर केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे, शेअर केलेल्या पोस्टमध्ये ट्रेड एक्सपर्ट उमर संधू म्हणतात, “ब्रेकिंग न्यूज, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुढच्या आठवड्यात पॅरिसमध्ये साखरपुडा करणार आहेत.” त्यांच्या या ट्विटने सध्या तरी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या दोघांचाही साखरपुडा एकमेकांच्या परिवाराच्या उपस्थितीतच आटोपणार आहे. साखरपुडा आता करत असून लग्न मार्च महिन्यात करीत आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वीच मलायकाचा मुलगा अरहान त्याच्या शिक्षणासाठी परदेशात गेला आहे. त्यावेळी विमानतळावर मलायका आणि अरबाज एकत्र येत त्याला पाठवले. सोबतच काही दिवसांपुर्वी अर्जुनचं आणि अरहानचं नातं व्यवस्थित नसल्यानं तो अरबाजसोबत राहत असल्याच्या बातम्या सर्वत्र चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT