Operation Sindoor Air Strike SAAM TV
मनोरंजन बातम्या

Operation Sindoor Air Strike : "जय हिंद की सेना …", रितेश देशमुख ते अनुपम खेर 'ऑपरेशन सिंदूर'वर बॉलिवूड काय म्हणाले?

Bollywood Celebrities Reaction : 'ऑपरेशन सिंदूर'वर बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रया दिल्या आहेत. कोण काय म्हणाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आज मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. हा हल्ला म्हणजे ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor Air Strike) होय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने हा हल्ला पाकिस्तानवर केला. ७ मे रोजी रात्री १.३० वाजताच्या आसपास भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. भारतीय लष्कराने पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. भारताने 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला. आता यावर बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील आपली प्रतिक्रिया देऊन भारताच्या या कामगिरीला पाठिंबा दिला आहे. तसेच भारताचे आणि पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आहे.

रितेश देखमुख

बॉलिवूड अभिनेता रितेश देखमुखने ट्विट करून ऑपरेशन सिंदूरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिलं की, "जय हिंद की सेना … भारत माता की जय !"

निमरत कौर

बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ऑपरेशन सिंदूरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आपल्या सैन्यासोबत एकजूट...एक देश. एक ध्येय...जयहिंद"

मधुर भांडारकर

चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ट्विट करून ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिला आहे. त्यांनी लिहिलं की, "आमच्या प्रार्थना आमच्या सैन्यासोबत आहेत. एक राष्ट्र, तुमच्यासोबत एकत्र आम्ही उभे आहोत. जय हिंद, वंदे मातरम..."

परेश रावल

बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी ऑपरेशन सिंदूरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूर, भारतीय सशस्त्र सेना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

अनुपम खेर

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत ऑपरेशन सिंदूरवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "भारत माता की जय!ऑपरेशन सिंदूर"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT