Bad Newz Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Bad Newz Movie : “खूपच विचित्र कथानक...”, विकी- तृप्तीचा ‘बॅड न्यूज’पाहून नेटकरी संतापले

Bad Newz Twitter Review : ‘बॅड न्यूज’ चित्रपट अखेर आज (१९ जुलै) रिलीज झालेला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

Chetan Bodke

तृप्ती डिमरी आणि विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टर, टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. चित्रपटातील ‘तौबा तौबा’ गाण्याने अगदी लहानांपासून थोऱ्या मोठ्यांपर्यंत सर्वांनाच थिरकायला भाग पाडले आहे. ‘बॅड न्यूज’ चित्रपट अखेर आज (१९ जुलै) रिलीज झालेला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि ॲमी वर्क स्टारर चित्रपटाला प्रेक्षक जरीही उत्तम प्रतिसाद देत असले तरीही समीक्षकांना चित्रपट आवडलेला नाही. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक युजर्सने चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

पहिला युजर म्हणतो, “बॉलिवूडमध्ये नेहमीच वेगवेगळ्या कथानकाचे चित्रपट बनवले जातात. चित्रपटाचे कथानक वेगळ्या पद्धतीचे असल्यामुळे पाहण्यासाठी वेगळी मज्जा आली. आजवर कोणीही न बनवलेले कथानक दिग्दर्शकांनी वापरले आहे. कलाकारांचा अभिनयही फार उत्तम...”, “तौबा- तौबा गाणं खरंच तौबा तौबा आहे. गाण्यामुळेच मी हा चित्रपट पाहायला आहे.”, “खूपच विचित्र चित्रपट आहे. इंटर्व्हलनंतर मला काहीच समजलं नाही.”

तर आणखी काही युजर म्हणतात, “विनोदी- ड्रामा आणि इमोशन्स असलेला हा चित्रपट आहे. आकर्षक कथानक आणि नॉन स्टॉप मनोरंजन” अनेकांनी ह्या चित्रपटाला नॉन एंटरटेनर फिल्म म्हणूनच बोलले आहे. अनेकांनी कलाकारांचे कौतुक केले असून काहींनी कथानकावरून दिग्दर्शकांना ट्रोल केले आहे. विकी कौशलसह सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे चाहते कौतुक करित आहे. चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू असून तृप्ती डिमरी या चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आलेली होती.

गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटातील एक सीन व्हायरल झाला होता. त्यामध्ये दोघांनीही इंटिमेट सीन्स दिले होते. म्हणून दोघेही सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले होते. चित्रपटाचे कथानक प्रेग्नेंसी आणि फादरहूडवर आधारित आहे. प्रमुख भूमिकेत तृप्ती डिमरी, विक्की कौशल, एमी विर्क, आणि नेहा धूपियाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT