Ritu Raj Singh Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rituraj Singh: प्रसिद्ध अभिनेता ऋतुराज सिंहचे निधन, रुग्णालयातून घरी येताना आला हार्ट अटॅक

Actor Rituraj Singh: ऋतुराजने या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ऋतुराजच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला असून सोशल मीडियावर पोस्ट करत चाहते आणि सेलिब्रिटी दु:ख व्यक्त करत आहेत.

Priya More

Rituraj Singh Passed Away:

टीव्ही इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंहचे (Rituraj Singh) निधन झाले आहे. ६० व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने ऋतुराजचे निधन झाले. अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांच्या आणि चित्रपटांच्या माध्यमातून ऋतुराजने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि त्यांचे मन जिंकले. ऋतुराजच्या निधनामुळे चाहते, टीव्ही इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला आहे.

ऋतुराज सिंहने 'ज्योती', 'हिटलर दीदी', 'शपथ', 'वॉरियर हाय', 'आहट और अदालत', 'दीया और बाती हम' यासारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. शेवटी तो रुपाली गांगुलीसोबत अनुपमा या मालिकेमध्ये दिसला. ऋतुराजने या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ऋतुराजच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला असून सोशल मीडियावर पोस्ट करत चाहते आणि सेलिब्रिटी दु:ख व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुराज सिंहला सोमवारी म्हणजे १९ फेब्रुवारीला रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ऋतुराज गेल्या काही दिवसांपासून स्वादुपिंडाशी संबंधित त्रासाने ग्रस्त होता. ऋतुराजच्या अचानक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ऋतुराजचा मित्र आणि अभिनेता अमित बहलने त्याच्या निधनाची बातमी माध्यमांना सांगत दु:ख व्यक्त केले. अमित बहलने सांगितले की, 'हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे ऋतुराज सिंहचे निधन झाले. स्वादुपिंडांशी संबंधित त्रासामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. यासाठी त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण रुग्णालयातून घरी येत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

26th July Rain : पालघरसह पुण्याला रेड अलर्ट, पाऊस धुमाकूळ घालणार, दोन जिल्ह्यात शाळांना सुट्टी

Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

SCROLL FOR NEXT