Priyanka Chopra Social Media Post  Instagram/ @priyankachopra
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra: देसी गर्लने मायदेशी येताच आवडत्या गोष्टींचा घेतला अनुभव; सोशल मीडियावर पोस्टची रिघ

प्रियंकाचे मुंबईत आगमन झाल्यानंतर काही खास पोस्ट केल्या आहेत. त्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधुन घेतले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Priyanka Chopra: बॉलिवूडच्या देसी गर्लने अमेरिकन गायक, गीतकार आणि अभिनेता निक जोनस सोबत जोधपूरमध्ये शाही थाटामाटात २०१८ यावर्षी लग्नबंधनात अडकली. प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर बरीच चर्चेत ही असते. तिच्या पोस्टने सोशल मीडियावर बरीच चर्चा होत असते.

नुकतीच काही दिवसांपुर्वी भारतात वास्तव्याला आली आहे. तिच्या सोबत तिचा पती, त्यांची मुलगी मालतीसोबत ती भारतात आली आहे. वैश्विक कोरोना महामारीनंतर प्रियंका भारतात आल्याने तिच्या चाहत्यांनी तिचे सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतात स्वागतही केले आहे.

भारतात आल्यानंतर तिचा विमानतळावरील एक व्हिडिओ बराच चर्चेत आहे. प्रामुख्याने कलाकारमंडळींचे मुंबईसोबतचे नाते हे वेगळेच आहे. त्याला अपवाद प्रियंकाही नाही. प्रियंकाचे मुंबईत आगमन झाल्यानंतर काही खास पोस्ट केल्या आहेत. त्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले आहे.

तिला परदेशात मुंबईची किती आठवण येत होती, हे त्या पोस्टमध्ये सांगितले आहे. प्रियंका भारतात मध्यरात्री पोहोचली . तिच्या आगमनाने विमानतळावर अनेक पापाराझींनी हजेरी लावली होती. मायदेशी परतल्यानंतर तिच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसुन येत आहे.

प्रियांका मुंबईतील घरी पोहोचल्यानंतर तिने एक फोटो शेअर केला आहे. यात ती विश्रांती घेताना दिसत असून यावेळी टीव्हीवर 'कॉफी विथ करण' हा शो पाहताना दिसत आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “जर तुम्ही टीव्हीवर करण जोहरचा शो पाहिला नसेल तर तोपर्यंत तुम्ही मुंबईत नाहीत.” असे ती म्हणाली आहे. याबरोबर तिने तिच्या आवडत्या वेफर्सचे फोटोही शेअर केले आहेत.

Priyanka Chopra Post

आणखी एक फोटो प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात तिच्या घरातून दिसणारा वरळी- बांद्रा सी लिंकचा फोटो शेअर केला. 'मी हे मोहक दृश्य पाहण्यासाठी फार तरसले होते.' असेही तिने कॅप्शन दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Prajakta Mali: खुशखबर! प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' आता मोफत पाहायला मिळणार, कधी अन् कुठे? वाचा अपडेट

Shirdi to Tirupati : शिर्डीवरून तिरुपतीला झटक्यात पोहचा, तब्बल १८ एक्सप्रेस धावणार, कोणकोणत्या स्थानकात थांबणार ट्रेन?

Pune News: पुणेकरांनो आज पाणी जपून वापरा, शहरातील 'या' भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

Ladki Bahin Yojana: लाडकीला जुलै महिन्याचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर, आजच नोट करा

SCROLL FOR NEXT