Bipasha Basu And Karan Singh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bipasha Basu: घर आई एक नन्ही परी, बिपाशा बसूला मिळाला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

बिपाशाला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bipasha Basu Update: बिपाशा बासू नुकतीच आई झाली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. लग्नाच्या सहा वर्षांनंतर अभिनेत्रीच्या घरी बाळ आले आहे. बिपाशा आणि करण १२ नोव्हेंबरला आई-वडील झाले. बाळाच्या जन्मानंतर करण सिंग ग्रोव्हरने आणि बिपाशा बासूने पोस्ट शेअर करत मुलीची आणि तिच्या नावाची माहिती दिली होती. आई-वडील झाल्यानंतर दोघांनाही खूप आनंद झाला आहे. बिपाशाला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, ज्याचे फोटो समोर आले आहेत.

बिपाशा आणि करण त्यांच्या मुलीला कुशीत घेतले आहे. यादरम्यान त्यांनी पापाराझींनाही जबरदस्त पोज दिली आहे. बिपाशाच्या हातात तिची मुलगी दिसत आहे. मुलीचा चेहरा दिसत नसला तरी दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. बिपाशा आणि करण दोघेही काळ्या कपड्यांमध्ये दिसत असल्याचे फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. (Bollywood)

12 नोव्हेंबरला पालक झाल्यानंतर करणने आपल्या मुलीचा फोटो शेअर करून तिचे नाव जाहीर केले होते. बिपाशाच्या मुलीचे नाव देवी बासू सिंग ग्रोवर आहे. बिपाशा आणि करण हे इंडस्ट्रीतील पॉवर कपल आहेत. अलोन चित्रपटाच्या सेटवर दोघांचे प्रेम फुलले. करण आणि बिपाशाने 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले होते. (Celebrity)

Bipasha Basu And Karan Singh Grover with their new born baby girl

लग्नाच्या सहा वर्षांनंतर बिपाशाने तिच्या गर्भधारणेची घोषणा केली. मुलीच्या जन्मानंतर बिपाशानेही फोटो शेअर करून याची माहिती दिली होती. बिपाशा तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. आता बिपाशाच्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. (Actress)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

SCROLL FOR NEXT