Article 370 Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yami Gautam च्या सस्पेंस-थ्रिलर 'Article 370' चा धासू टीझर आऊट, दहशतवाद्यांशी दोन हात करताना दिसली अभिनेत्री

Yami Gautam Movie Article 370 : 'आर्टिकल 370' च्या टीझरमध्ये यामी गौतमचा बिनधास्त आणि निडर अवतार पाहायला मिळत आहे. या चित्रपटच्या टीझरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

Priya More

Article 370 Teaser Out:

'ओह माय गॉड 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पुन्हा जबरदस्त कमबॅक करणारी अभिनेत्री यामी गौतम लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामी गौतम 'आर्टिकल 370' या चित्रपटात दिसणार आहे. यामीच्या या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. यामी गौतमीच्या या चित्रपटाचा टीझर (Article 370 Teaser) नुकताच रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये यामी गौतमचा बिनधास्त आणि निडर अवतार पाहायला मिळत आहे. या चित्रपटच्या टीझरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'चे दिग्दर्शक आदित्य धर यांचा नवा चित्रपट 'आर्टिकल 370'चा टीझर आणि फर्स्ट लुक पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे. जिओ स्टुडिओने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हा टीझर शेअर केला आहे. काश्मीरमधील राजकारण, भ्रष्टाचार आणि दहशतवादाची झलक देणारा हा टीझर खूपच रंजक आहे. या चित्रपटात यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर 'द फॅमिली मॅन' या चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री प्रियमणीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये काश्मीरमधील दगडफेकीच्या काही मूळ क्लिपही पाहायला मिळणार आहेत.

'आर्टिकल 370' या चित्रपटाच्या शीर्षकावरून समजून येते की त्याची कथा काश्मीरला लागू असलेल्या कलम 370 शी संबंधित आहे. 1 मिनिट 40 सेकंदांच्या या टीझर व्हिडिओमध्ये दिसतेय की, चित्रपटाच्या कथेचे कथानक हे कलम 370 खोऱ्यातून हटवण्याबाबत आहे. काश्मीरमध्ये कलम 370 लागू असताना तेथील राजकारणी खोऱ्याच्या आर्थिक स्थितीला कसे हानी पोहोचवत होते, हेही दाखवले जात आहे. यामी या चित्रपटात भारतीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या 'आर्टिकल 370'चा हा टीझर खूपच छान दिसत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून या टीझरला खूप चांगली पसंती मिळत आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता खूपच वाढली आहे. 'आर्टिकल 370'चा टीझर समोर आल्यानंतर या चित्रपटाच्या रिलीजची चर्चा जोर धरू लागली आहे. यामी गौतमचा हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 ला प्रदर्शित होणार आहे. 'उरी-द सर्जिकल स्ट्राइक'या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि यामी गौतमचा पती आदित्य धर या चित्रपटाच्या निर्मात्याची धुरा सांभाळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT