Urfi Javed New Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: ऐकेल ती उर्फी जावेद कसली... पुन्हा बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली, Kiss My...

ऐकेल ती उर्फी कसली, हिनं सध्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून पुन्हा चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Urfi Javed: सध्या बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच या ना त्या कारणावरुन चर्चेत असते. सोशल मीडियावर बोल्ड व्हिडीओ आणि फोटोज् शेअर करणाऱ्या उर्फीच्या विरोधात महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या ठिकाणी महिलांकडून तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.

सध्या उर्फीवर पुण्याच्या कोथरुडमधील (Pune) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिच्यामुळे इतका वाद उफाळला असला तरी, तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत वादाला आणखी दिशा दाखवली आहे. उर्फी नेहमीच सोशल मीडियावर विविध कारणांनी ट्रोल होते.

यासर्वात उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात बरेच कपड्यांवरुन वाद झाले आहेत. तिच्यावर काही क्षेत्रातील दिग्गजांनीही इतकी कान उघडणी केली असली तरी, तिच्या डोक्यात कोणताच प्रकाश पडलेला नाही. ऐकेल ती उर्फी कसली, हिनं सध्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून पुन्हा चर्चेत आली आहे. 'किस माय...' असं म्हणत उर्फीने फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

उर्फीने हा फोटो ट्वीटरवर शेअर केला असून तिच्या पोस्टला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अतरंगी, नाना तऱ्हेवाईक कपड्यांमुळे आणि विचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणारी ही अभिनेत्री आहे. कोणत्याही गोष्टीचा वापर करत उर्फी सोशल मीडियावर फोटोशूट करते. अगदी शिंपले, ब्लेड, फुलं, झाडांची पानं अगदी तिनं आपला स्मार्टफोनही सोडला नव्हता. तिच्या या सर्व फोटोंची सोशल मीडियावर कमालीची चर्चा झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT