Urfi Javed Latest Photoshoot Instagram/ @urf7i
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: उर्फीच्या क्रिएटिव्हिटीला तोडच नाही, व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या पुन्हा उठल्या नजरा !

ती कधी कोणते कपडे घालून फोटोशूट करेल याचा काही नेम नसतो. आता पुन्हा एकदा नवीन कपड्यांमध्ये उर्फी दिसून आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Urfi Javed Viral Video: उर्फी जावेद (Urfi Javed) हे नाव उच्चारल्या उच्चारल्या आपल्या डोळ्यासमोर नेहमीच काही तरी वेगळे फॅशन सेन्स येतात. उर्फी आपल्या हटक्या फॅशन सेन्सने खूपच चर्चेत असते. कधी कागद, सिम कार्ड, सीडी, फुलांनी, झाडाच्या पालापाचोळ्यांनी ड्रेस घालत हटक्या स्टाईलने ऊर्फी जावेद नजरेसमोर येते. जरी या क्रिएटिव्हिटी करणे तिला आवडत असले तरी सोशल मीडियावर नेटकरी भरपूर ट्रोल करतात. तिच्या या ट्रोलधाडी मुळे आणखी आवडीने आपली फॅशन सेन्स ती वापरते.

ती कधी कोणते कपडे घालून फोटोशूट (Viral Photo) करेल याचा काही नेम नसतो. आता पुन्हा एकदा नवीन कपड्यांमध्ये उर्फी दिसून आली आहे. तिने यावेळी जुन्या कॅसेटच्या रील्सचा वापर करून ड्रेस बनवला आहे. तिच्या या युनिक आणि हटके ड्रेसमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Viral Video)

पुन्हा एकदा तिच्यावर ट्रोलधाडी सुरु असून तिची सोशल मीडियावर चर्चा रंगली. या ड्रेसचा तिने व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला असून त्यावर नेटकऱ्यांकडून भन्नाट कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. (Social Media)

शेअर केलेल्या व्हिडिओत उर्फी एका जुन्या म्युझिक सिस्टमजवळ बसलेली दिसत आहे. सोबतच काही जुन्या कॅसेट्सही दिसतात. उर्फी या कॅसेट्स उचलू लागते आणि यापासून ड्रेस बनवते. या कॅसेट रीलपासून उर्फीने शॉर्ट स्कर्ट आणि ब्रॅलेट टॉप बनवलाय. उर्फीचा हा लूक खूपच आकर्षक दिसत आहे. काही चाहते तिच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक करत आहे तर काही तिच्यावर टीका करत आहे.

उर्फी आपल्या एका गाण्यामुळे जबरदस्त ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. काही दिवसांपूर्वी तिचे एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. गाण्याचे नाव ' हाय हाय ये मजबुरी' असे होते. ती या गाण्याच्या शूटिंग दरम्यान पडली देखील होती, तिचा तो व्हिडिओ ही नेटकऱ्यांनी चांगलाच व्हायरल केला होता.

मात्र आता याच गाण्यामुळे उर्फी परत एकदा अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. एका इंग्लिश वृत्तपत्राने दिलेलेल्या वृत्तानुसार एका व्यक्तीने उर्फीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने उर्फीवर तिच्या नवीन गाण्यात अतिशय लहान आणि अयोग्य ड्रेस घातल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल केला आहे. उर्फीने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT