Sushmita Sen Birthday Instagram @sushmitasen47
मनोरंजन बातम्या

Sushmita Sen Birthday: एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलने दिल्या सुष्मिता सेनेला खास शुभेच्छा; पुन्हा येणार का एकत्र ?

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sushmita Sen Birthday Special: मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिचा आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मिता सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या प्रोफेशन लाईफसह, वैयक्तिक आयुष्यामुळे देखील ती चर्चेत असते. सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलने तिच्या वाढदिवसाला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते. दोघांचे बाँडिंग खूप चांगले होते, पण गेल्या वर्षी दोघे वेगळे झाले. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्यांचे नाते संपुष्टात आल्याची माहिती दिली होती.

रोहमनने सुष्मिताला तिच्या 47 व्या वाढदिवसाच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. रोहमनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सुष्मिता सेनचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. यासह त्याने रेड हार्टसह 47 लिहिले आहे. या फोटोमध्ये सुष्मिता खूपच सुंदर दिसत आहे. (Birthday)

सुष्मिता सेनची रोहमन शॉलसोबतची प्रेम कहाणीही खूप रंजक होती. आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे, पण आजही ते मित्र आहेत आणि अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात. खरंतर रोहमन शॉल हा सुष्मिताचा चाहता होता. एक दिवस रोहमनने सुष्मिताला इंस्टाग्रामवर मेसेज केला आणि एक दिवस चुकून सुष्मिताने रोहमनचा मेसेज पाहिला आणि रिप्लायही दिला. त्यानंतर रोहमनने तिला मेसेज केला की तो आनंदाने रूममध्ये उड्या मारत आहे. (Social Media)

Rohman Shawl Instagram story

सुष्मिताला रोहमन आवडला आणि दोघे बोलू लागले. यानंतर भेटीगाठी सुरू झाल्या आणि दोघे रिलेशनशिपमध्ये आले. दोघे आता वेगळे झाले आहेत. तरीही रोहमन अनेकदा सुष्मितासोबत दिसत असतो. सुष्मिताच्या मुलींसोबतही त्याचे चांगले संबंध आहेत. तिच्या ब्रेकअपचे वर्णन करताना सुष्मिताने लिहिले की, 'याची सुरुवात मैत्रीपासून झाली आणि ती कायम राहील. नातं संपलं, प्रेम नाही. (Relationship)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT