Shruti Hasan Instagram/ @shrutzhaasan
मनोरंजन बातम्या

Shruti Hasan: श्रृती हसनचे अस्वस्थ करणारे फोटो व्हायरल, आजारपणाबद्दल माहिती देत म्हणाली…

नुकतेच श्रुती हसनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे श्रृती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shruti Hasan Viral Photo: बॉलिवूडमधील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यासोबतच कलाकार आपल्या ग्लॅमरस आणि डॅशिंग लूकमुळे ते चर्चेत असतात. कायमच सिनेस्टार्स आपले खास फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या त्या फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत असते. मात्र नुकतेच श्रुती हसनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे श्रृती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

श्रुतीने तिच्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर असे काही फोटो शेअर केले आहेत, जे सहसा अभिनेत्री ते फोटो कधी शेअर करत नाहीत. पहिल्या फोटोत श्रुतीने केस मोकळे सोडले असून दुसऱ्या फोटोत आजारी आणि थकलेली दिसत आहे.

हे फोटो शेअर करत श्रुतीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “परफेक्ट पोस्ट आणि सेल्फीच्या जगात माझे काही लूक फायनल होऊ शकले नाहीत. खराब केसांचा दिवस, ताप, सायनसमुळे सुजलेला चेहऱ्यासोबतच मासिक पाळीचा त्रास आणि आराम. तुम्हाला माझा हा लूकही नक्कीच आवडेल अशी आशा आहे.”

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रुतीने तिच्या नाकाची सर्जरी केल्याचा खुलासा केला होता. “मी माझ्या नाकाची सर्जरी केली आहे. माझ्या नाकाला दुखापत झाल्यामुळे मी सर्जरी केली.” असे श्रुतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले होते.

स्टार्सच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला असला तरी श्रुतीची ही साधी स्टाईलही लोकांची मनं जिंकत आहे. तिचे हे फोटो लोकांना खूप आवडले असले तरी तिच्या साधेपणाचं कौतुक सर्वत्र केले जात आहे. या पोस्टवर कमेंट करत एका यूजरने लिहिले की, "खूप निष्पाप चेहरा." तर दुसर्‍या युजर्सने "अजूनही सुंदर" अशी कमेंट केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉस्टेलमधील मुलींना नेत्यांकडे पाठवलं जातं, खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

Success Story: १.५ गुणांनी संधी हुकली, पण हार मानली नाही; पुढच्याच प्रयत्नात समर्थ राकलेंनी क्लास-१ अधिकारी होऊनच दाखवलं

Deepika Padukone: स्पिरिट, कल्किनंतर आता तिसऱ्या चित्रपटातून दीपिकाचा पत्ता कट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT