Shilpa Shetty Reveals She Is Scared Of This Thing Saam tv
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty Birthday : फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीच्या मनात कोणती भीती? शुटिंगला जाताना करते 'ही' गोष्ट

Shilpa Shetty Reveals She Is Scared Of This Thing : आज शिल्पा शेट्टीचा वाढदिवस आहे. कायमच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत राहणारी शिल्पा एका गोष्टीला फार घाबरते.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे नाव इंडस्ट्रीतील 'सुपर से भी ऊपर' अभिनेत्रींमध्ये आवर्जुन घेतले जाते. तिच्या निखळ सौंदर्याची आणि फिटनेसचे लाखो चाहते आहेत. आज शिल्पा शेट्टीचा वाढदिवस आहे. ८ जून १९७५ रोजी जन्मलेली शिल्पा आज ४९ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. तिने सिनेसृष्टीमध्ये डेब्यू केल्यापासून हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. आज शिल्पाच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

कायमच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत राहणारी शिल्पा एका गोष्टीला फार घाबरते. ते म्हणजे, ती कार चालवायला खूप घाबरते. ती नेहमीच कार चालवण्यासाठी आपल्या ड्रायव्हरला सोबत घेऊन जाते. मनामध्ये कार चालवण्याची भिती असल्यामुळे ती केव्हाच कार चालवत नाही. तिच्या ह्या भितीची कायमच सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चा होते.

शिल्पा शेट्टीने १९९३ मध्ये ‘बाजीगर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. पहिल्याच चित्रपटात शिल्पाने आपल्या अभिनयानं अनेक दिग्गज अभिनेत्रींचा घाम फोडाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला असून तिने आपल्या फिल्मी आयुष्यात कधीच मागे वळून पाहिले नाही. आज ती केवळ एक यशस्वी अभिनेत्रीच नाही तर अनेकांसाठी आदर्श देखील ठरलीय. अभिनयासोबतच शिल्पाने बिझनेस आणि फिटनेसमध्येही आपले नशीब चमकवले. शिल्पाने खरंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले ते, एका कोल्ड्रिंकच्या जाहिरातीतून. तिने ती जाहिरात केली आणि तिचे नशीबच पालटले.

शिल्पाने चित्रपट आणि जाहिरातींमधून अनेक कोटींचा व्यवसाय केला आहे. सोबतच शिल्पाने अनेक फिटनेस संबंधित व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातून ती अनेक कोटींचा व्यवसाय सांभाळते. याशिवाय तिचे अनेक व्यवसाय आहेत जिथून ती बराच पैसा कमावते. शिल्पा सध्या अभिनयासोबतच अनेक फिटनेस संबंधित व्यवसाय पाहत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शिल्पाची एकूण संपत्ती सुमारे १५० कोटी रुपयांची आहे. अभिनेत्रीचं मुंबईमध्ये अलिशान सीफेस अपार्टमेंट असून त्याची किंमत १०० कोटींहून अधिक आहे.

शिल्पाचं स्वत:चं रेस्टॉरंट असून ती ‘सिंपल सोलफुल: शिल्पा शेट्टी’ या फिटनेस ॲपवरूनही कमाई करते. शिल्पाला अलिशान कारची प्रचंड आवड आहे. तिच्याकडे, BMW, Mercedez Benz, Renge Rover, Bently आणि Lamborghini Aventador सारख्या महागड्या लक्झरियस कार्स आहे. शिवाय तिच्याकडे खाजगी जेट देखील आहे. शिल्पाने २००९ मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले. त्यांना विआन आणि शमिशा अशी दोन मुलं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र हादरला! एकट्यात बसलेल्या मुलीवर वाकडी नजर; नराधमाकडून स्वतःच्या घरी नेऊन अत्याचार

Maharashtra Live News Update: शरद पवार बारामतीत अॅक्शन मोडवर

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

Tea Types: तुम्हीही चहाप्रेमी आहात? मग चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT