Rimi Sen On Trollers Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rimi Sen : प्लास्टिक सर्जरीवरुन ट्रोल झाल्यानंतर रिमी सेनने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'कोणताही गुन्हा करून...'

Rimi Sen On Trollers : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रिमा सेन हिचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. तो फोटो पाहून अभिनेत्रीला ओळखणंही कठीण झाले आहे. फोटोपाहून अभिनेत्रीने

Chetan Bodke

अभिषेक बच्चन, शाहिद कपूर आणि अजय देवगण सारख्या अनेक सुपरस्टारसोबत अभिनेत्री रिमी सेन हिने काम केले आहे. रिमी सेन हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान प्रस्थापित केले आहे. गेल्या ११ वर्षांपासून ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. ह्या वर्षामध्ये अभिनेत्रीमध्ये खूप बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. तो फोटो पाहून आता अभिनेत्रीला ओळखणंही फार कठीण झाले आहे.

सध्या सोशल मीडियावर रिमीने प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा सूरू आहे. यामुळे अभिनेत्रीला अनेक युजर्सने तुफान ट्रोल केलं आहे. या ट्रोलिंगवर आता तिने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे. नुकतंच अभिनेत्रीने हिंदुस्थान टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री ट्रोलर्सवर चांगलीच भडकली होती. "जर ट्रोलर्सना वाटत असेल तर होय मी प्लास्टिक सर्जरी केली आहे. जर लोकं ही गोष्ट सकारात्मक पद्धतीने बोलत असतील तर माझ्यासाठी ही गोष्ट चांगली आहे. मी अजून प्लास्टिक सर्जरी केलेली नाही, तरीही मला लोकं बोलत आहे."

अभिनेत्री पुढे मुलाखतीत म्हणाली, "मी केवळ फीलर्स, बॉटोक्स आणि पीआरपी ट्रीटमेंटच केलेली आहे. त्याशिवाय दुसरी कोणतीही मी ट्रीटमेंट केलेली नाही. जोपर्यंत एखादा व्यक्ती कोणताही गुन्हा करून पळून जात नाही, तोपर्यंत त्याला प्लास्टिक सर्जरीची गरज भासत नाही. भारताबाहेर बरेच चांगले डॉक्टर आहेत जे फेसलिफ्ट करण्यामध्ये तरबेज आहेत. मी सुद्धा फेसलिफ्ट करायच्या विचारत आहे. पण मी वयाच्या ५० व्या वर्षानंतर त्याचा विचार करेल. सध्या जे आहे त्यामध्ये काम सुरू आहे."

रिमी सेन एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असून तिने 'हंगामा', 'क्योंकी', 'हेरा फेरी' आणि 'गोलमाल' सारख्या सुपर डुपर हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ४२ वर्षीय रिमा अनेक वर्षांपासून कोणत्याही चित्रपटांत दिसली नाही. सोबतच रिमी 'बिग बॉस ९' आणि 'झलक दिखला जा ९' यांसारख्या अनेक रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Career Horoscope : आजपासून ‘या’ ५ राशींचं नशीब पालटणार! कामाचा ताण होईल कमी अन् पैशांचा पाऊस पडणार

Earphone side effects: इअरबड्स काढल्यानंतरही कानात शिट्टीसारखा आवाज ऐकू येतोय? शरीराचा हा इशारा अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: ....अन्यथा मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांचा व शासकीय वाहनांचा लिलाव करणार- रविकांत तुपकर

Govinda: 'तू तिला माझी जागा देणार...'; गोविंदा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ? राखी सावंतसमोर सुनीताने केला मोठा खुलासा

Ganpati Festival : गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय! स्वस्तात एसटीचं तिकीट बुक करता येणार

SCROLL FOR NEXT