Rekha On Signing Movies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rekha On Movies: रेखा ९ वर्षांपासून रूपेरी पडद्यापासून दूर का? अभिनेत्रीनं मुलाखतीत केला खुलासा

Rekha Bollywood Film: रेखा यांनी इतके वर्ष रूपेरी पडद्यापासून का राहिल्या, याचे कारण स्पष्ट केले.

Chetan Bodke

Rekha On Signing Movies: आपल्या एव्हरग्रीन सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजेच रेखा होय. गेल्या अनेक दिवसांपासून रेखा बॉलिवूडपासून जरी दुर असल्यातरी त्यांची आजही बॉलिवूडमध्ये कायम चर्चा असते. कधी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी आपल्या फिल्मी लाईफमुळे रेखा नेहमीच चर्चेत राहतात.

रेखा गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेल्या नाहीत. त्यांनी २०१४ मध्ये अखेरचा चित्रपट साईन केला होता. त्यानंतर त्या कोणत्याही चित्रपटात दिसल्या नसल्या तरीही अनेकदा बॉलिवूड पार्टीत स्पॉट झाल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने इतक्या वर्ष का रूपेरी पडद्यापासून का राहिल्या, याचे कारण स्पष्ट केले.

रेखाने तेलुगू चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तर सावन भादो या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. या चित्रपटानंतर रेखाने बॉलिवूडमध्येच काम करण्याचं ठरवलं. सुपर नानी हा रेखाचा बॉलिवूडमधील शेवटचा चित्रपट ठरला. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला.

रेखा व्होग अरेबिया या संकेतस्थळाला मुलाखतीत म्हणतात, “२०१४ पासून तिने कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम केलेले नाही. मी चित्रपट करो किंवा न करो, बॉलिवूड माझी काही पाठ सोडणार नाही. माझे आयुष्य जगण्यासाठी माझ्याकडे जुन्या आठवणी आहेत, ज्या मला खूप प्रिय आहेत. जेव्हा योग्य वेळ असेल, तेव्हा मी योग्य प्रोजेक्ट शोधेल. माझं स्वत:चं व्यक्तिमत्व स्वत:च आहे, पण माझं सिनेमॅटिक व्यक्तिमत्त्व समोरच्याच्या नजरेत येईल असे आहे.”

मुलाखतीत रेखा पुढे म्हणते, “मला कुठे राहायचंय आणि कुठे रहायचे नाही हे माझं स्वत:च ठरवते. मी खूप भाग्यवान आहे. मला जे आवडते ते निवडण्याचा अधिकार मला मिळाला. आणि मला नाही म्हणण्याचा देखील अधिकार मिळाला आहे.”

रेखा नुकत्याच हिंदी टेलिव्हिजन शो ‘गम है किसी के प्यार में’च्या प्रोमोमध्ये दिसल्या होत्या. प्रोमोमध्ये रेखाला पाहून चाहते खूप खूश आहेत. प्रेक्षक अजूनही रेखाच्या नवीन प्रोजेक्टच्या अनाऊंसमेंटच्या घोषणेची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: भारतातील सर्वात लहान दोन अक्षरांचे नाव असलेले रेल्वे स्टेशन कोणते?

ITR Filling 2025: तुमच्या उत्पन्नानुसार निवडा आयटीआर फॉर्म! कोणासाठी कोणता फॉर्म योग्य? वाचा सविस्तर

Ranveer Singh : 'धुरंधर'चा जबरदस्त टीझर, रणवीर सिंहसोबत रोमान्स करणारी अभिनेत्री कोण? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : फ्रीवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Thakrey Brothers Vijayi Melava : अखेर तो क्षण आलाच! राज-उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहून महिलेला अश्रू अनावर; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT