Urmila Matondkar Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urmila Matondkar Birthday: मैत्री, प्रेम अन् लग्न; वयाच्या ५० व्या वर्षी का घेतला रंगीला गर्लने घटस्फोट?

Urmila Matondkar Lovestory: उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर यांनी २०१६ मध्ये लग्न केले. त्यांची लव्हस्टोरी अत्यंत युनिक आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूडची रंगीला गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही लोकप्रिय आहे. उर्मिलाने तिच्या सिनेसृष्टीतील कारकीर्दीत ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपट आणि मालिकांमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्रीला तिच्या पर्सनल लाईफमध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे.

उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर यांनी २०१६ मध्ये लग्न केले. त्यांची लव्हस्टोरी अत्यंत युनिक आहे. दोघांनीही आतंरजातीय विवाह केला आहे. उर्मिला आणि मोहसीन यांची भेट दोघांचाही कॉमन फ्रेंड बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यामुळे झाली. मनीष मल्होत्राची भाची रिद्धीच्या लग्नात उर्मिला आणि मोहसीन हे दोघे एकमेकांना भेटले. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सुरूवातीला दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. यानंतर या दोघांच्या भेटी वाढल्या. काही दिवसांनी मोहसीनने उर्मिलाला लग्नासाठी प्रपोज केले पण उर्मिला हे मान्य नव्हते. १ वर्ष मोहसिनने उर्मिलाशी बोलण्याचा प्रयत्न केला मोहसीन उर्मिलाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. यानंतर उर्मिलाने प्रेमाला होकार दिला.

एकमेकांवर अपार प्रेम करणारे उर्मिला आणि मोहसिन यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा विचार केला. मात्र लग्नाचा विचार केल्यानंतर या दोघांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मोहसिन हा उर्मिला पेक्षा १० वर्षाने लहान असून मुस्लिम आहे. वय आणि धर्माचा कोणताही विचार न करता उर्मिला वयाच्या ४२ व्या वर्षी मोहसिनशी विवाहबंधनात अडकली. हिंदू आणि इस्लाम या दोन्ही पद्धतीनुसार उर्मिला-मोहसिनने लग्न केलं. २०१६ मध्ये अत्यंत कमी लोकांमध्ये कुटुंबियांच्या उपस्थित या दोघांनी लग्न केले. इंडस्ट्रीतून केवळ मनिष मल्होत्रा या लग्नात उपस्थित होता. उर्मिलाने मोहसिनच्या प्रेमासाठी धर्म आणि वयाचे बंधन झुगारून लग्न केले होते. उर्मिलाने लग्नाच्या आठ वर्षानंतर पती मोहसीन अख्तरशी घटस्फोट घेतला आहे. सप्टेंबरमध्ये या दोघांनीही परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT