Rakhi Sawant New Shoes Instagram
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: राखीने एमसी स्टॅनची उडवली खिल्ली, ८० हजाराचे शूज पाहून नेटकऱ्यांच्या जीवाचा तिळपापड

नुकतंच एका प्रमोशन दरम्यान राखीने आपले 80 हजाराचे बूट फोटोग्राफर्सला दाखवले आहेत. त्यामुळे सध्या तिला नेटकरी बरेच ट्रोल करीत आहे.

Chetan Bodke

Rakhi Sawant: राखीच्या खासगी आयुष्यातील अनेक किस्से सध्या गेल्या दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. सोबतच राखी सध्या तिच्या नवीन म्युझिक व्हिडिओ 'झूठा'मुळे चर्चेत आहे. तिच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असलेल्या या गाण्याचे ती जोरात प्रमोशन करत आहे. जोडीदाराने केलेली फसवणूक आणि आईच्या मृत्यूने हताश झालेली राखी असे अनेक दृश्य या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. म्युझिक लाँचिंग इव्हेंटमध्ये अक्षरश: राखी ढसा ढसा रडली. नुकतंच एका प्रमोशन दरम्यान तिने आपले 80 हजाराचे बूट फोटोग्राफर्सला दाखवले आहेत. त्यामुळे सध्या तिला नेटकरी बरेच ट्रोल करीत आहे.

सर्वात आधी रितेशमुळे तर आता आदिलमुळे तिच्या आयुष्यात अनेक वादळ आले. राखीने आदिलसोबत मे २०२२ मध्ये लग्न केले होते, पण त्या लग्नाचा खुलासा राखीने जानेवारी २०२३ मध्ये केला होता. तेव्हापासून तिच्या आयुष्यातील वादळ शांत होण्याचं नाव घेत नाही. सध्या आदिल खान दुर्रानी तुरुंगात असून राखी तिच्या करिअरमध्ये व्यग्र आहे. नुकतीच तिला एका वेबसीरिजची ऑफर मिळाली असून लवकरच ती परदेशात शूटिंगसाठी रवाना होणार आहे.

'झूठा'या म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनदरम्यान राखीला पापाराझींनी स्पॉट केले होते. यादरम्यान तिने कॅमेरामन्सला 80 हजारांचे बूट दाखवले. तेव्हापासून ती सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली आहे. यावेळी राखी कॅमेरामन्सला म्हणते, 'माझे नवीन शूज बघा. ८०,००० चे शूज घेतले... सेम त्या एमसी स्टॅंड सारखे. सॉरी एमसी स्टॅनसारखे. स्टॅन असो की स्टॅंड पण तो खूप चांगला आहे.'

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. अनेक युजर्सने राखीला चर्चेत येण्यासाठी काहीही करते असं म्हटलं आहे तर, काहींनी तिला चर्चेत राहण्यासाठी तू एमसी स्टॅन सारखे शूज विकत घेतले, अशी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Risk: महाराष्ट्रात कॅन्सरचा धोका कमी; बीड-धाराशिवमध्ये परिस्थितीत अजूनच दिलासादायक, अभ्यासातून माहिती समोर

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याने उच्चांक गाठला; वाचा २२ आणि २४ कॅरेट्स सोन्याचे आजचे दर

Maharashtra Live News Update: सायन पनवेल महामार्ग वाहतूक कोंडी

Navi Mumbai Airport नामकरणावरून वाद न्यायालयात, केंद्र सरकारकडून निर्णयाला विलंब

'Bigg Boss 19'च्या घरामध्ये राडा; 5 सदस्य नॉमिनेट, कुणाचा पत्ता कट होणार?

SCROLL FOR NEXT