Poonam Pandey Pass Away Due To Cancer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey Death News : बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेचे कॅन्सरमुळे निधन, चाहत्यांना मोठा धक्का

Poonam Pandey Death Due to Cancer : पूनम पांडेबाबत एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. पूनम पांडेचे निधन झाल्याची ही सोशल मीडिया पोस्ट असून यामध्ये पूनम पांडेचे निधन गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे झाल्याचे म्हटले आहे.

Priya More

Poonam Pandey Died Due To Cancer:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि लॉकअप कंटेस्टंट पूनम पांडेबाबत (Poonam Pandey) एक दु:खद बातमी समोर येत आहे. 32 व्या वर्षी पूनमचे निधन झाले आहे. पूनम पांडेबाबत एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. पूनम पांडेच्या निधनाबाबत ही सोशल मीडिया पोस्ट असून गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे तिचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे.

पूनम पांडेच्या निधनासंबंधित ही पोस्ट तिच्याच अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. पूनम पांडेची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नक्की पूनम पांडेचे निधन (Poonam Pandey Dies) झाले आहे की ही फेक न्यूज आहे अशाप्रकारच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. तिच्या चाहत्यांना यावर विश्वस बसत नाहीये. या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी धक्का बसल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आणि दुःखद होती. आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की आमची लाडकी पूनम पांडेचे निधन झाले आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे आम्ही तिला गमावले आहे. जोपण तिच्या संपर्कात आला आहे ती त्याच्याशी खूप प्रेमाने भेटली आहे. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही गोपनीयतेची विनंती करतो.'

पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील ही पोस्ट पाहिल्यानंतर लोकांचा विश्वास बसत नाही. काहींचा विश्वास आहे की ही पोस्ट फेक आहे. तर काही म्हणतात की तिचे अकाऊंट हॅक झाले आहे. पूनम पांडेच्या या पोस्टवर कमेंट करत एकाने लिहिले की, 'अरे तिचे अकाऊंट हँक झाले आहे का?' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'आशा करतो की ही पोस्ट खोटी असावी.' पूनम पांडेने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'नशा' आणि 'द जर्नी ऑफ कर्मा' या चित्रपटामध्ये तिने काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT