Parineeti Chopra Birthday SAAM TV
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra Birthday : परिणीतीचा कोणता चित्रपट ठरला सुपरहिट? बॉक्स ऑफिसवर किती कमावले?

Parineeti Chopra Superhit Movie : परिणीती चोप्राचा बॉलिवूडचा प्रवास चढउतारांनी भरलेला होता. या प्रवासात तिने किती फ्लॉप आणि हिट चित्रपट दिले जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आज (22 ऑक्टोबर) बॉलिवूडची अभिनेत्री सुपरस्टार परिणीती चोप्रा (Parineeti Chopra Birthday ) हिचा वाढदिवस आहे. परिणीती चोप्राने अनेक चित्रपट केले आहेत. ती गेल्या 13 वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. परिणीतीचे काही चित्रपट गाजले तर काही चित्रपट फ्लॉप ठरले. मात्र परिणीतीने प्रत्येक चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

अलिकडेच परिणीती अमर सिंह चमकीला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. हा चित्रपट इम्तियाज अलीचा होता. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरपूर दाद मिळाली. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटासाठी परिणीतीने खूप वजन वाढवले होते.

परिणीती चोप्राने 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट 2011मध्ये रिलीज झाला. त्यानंतर परिणीती 'इश्कजादे' या चित्रपटात दिसली. तिचा हा चित्रपट खूप हिट ठरला. ज्यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने अर्जुन कपूरसोबत काम केलं होत. तसेच या चित्रपटाची गाणी आजही लोकांना खूप आवडतात.

2017 मध्ये रोहित शेट्टीचा गोलमाल अगेनमध्ये परिणीतीने काम केलं आणि तिचा हा चित्रपट खूप हिट ठरला. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाने 205.69 कोटींची कमाई केली होती. परिणीतीचा केसरी आणि अमर सिंग चमकीला हे चित्रपट हिट ठरले. तसेच परिणीतीचा 'शुध्द देसी रोमान्स' हा 2013चा चित्रपटही खूप गाजला.

परिणीतीचे या नंतरचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. ज्यात दावत-ए-इश्क, किल दिल, मेरी प्यारी बिंदू, नमस्ते इंग्लंड, जबरिया जोडी, संदीप और पिंकी फरार, मिशन राणीगंज, कोड नेम-तिरंगा आणि हसी तो फसी यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

SCROLL FOR NEXT