Nushrratt Bharuccha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nushrratt Bharuccha: लोकांचे रानटी विचार...; RCB जिंकल्यानंतर नुसरत भरुचा ट्रोल, 'त्या' आवाजाबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Nushrratt Bharuccha: RCBच्या जिंकल्यानंतर शेअर केलेल्या व्हिडिओतील आवाजावरून नुसरत भरुचा ट्रोल झाली. अभिनेत्रीने तो आवाज कुत्र्याच्या पिल्लाचा असल्याचा दावा करत सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे.

Shruti Vilas Kadam

Nushrratt Bharuccha: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाने IPL 2026 चे विजेतेपद जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी नुसरतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ऐकू आलेल्या आवाजाचा काही सोशल मीडिया युजर्सनी वेगळाच अर्थ लावला आणि अभिनेत्रीवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

ट्रोलिंग वाढल्यामुळे नुसरतने सोशल मीडियावर सविस्तर स्पष्टीकरण देत संपूर्ण घटनेमागील सत्य मांडले. इंस्टाग्राम स्टोरीजवर तिने काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करत त्या आवाजाचा खुलासा केला. नुसरतच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओमध्ये ऐकू येणारा आवाज हा कोणत्याही व्यक्तीचा नसून एका लहान कुत्र्याच्या पिल्लाचा होता.

तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, काही लोकांनी या प्रकरणात मर्यादा ओलांडल्या आहेत. एका कुत्र्याच्या पिल्लाच्या रडण्याच्या आवाजावरून नकोत्या चर्चा रंगल्या आहेत. इतकेच नव्हे तर काहींनी तिच्या नावाने खोटे स्पष्टीकरणही पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला.

नुसरतने पुढे सांगितले की, मी एका मित्राच्या घरी RCBचा सामना पाहत होती. त्या घरात असलेल्या कुत्र्याचे पिल्लू सतत रडण्यासारखे आवाज काढत होते. याच वेळी माझ्या मित्राने व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तो व्हिडिओ तिने शेअर केला. चर्चा अधिक रंगू नये म्हणून मी व्हिडिओ स्टोरीवरून हटवला होता. मला नेमके याच प्रकारच्या गैरसमजाची भीती वाटत होती. त्यामुळेच मला तो व्हिडिओ हटवण्याचा सल्ला देण्यात आला आणि मी तो मान्य केला,” असे तिने स्पष्ट केले.

या व्हिडिओमुळे तिला ट्रोलिंग करणाऱ्यांवरही अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करू नका, गोष्टींचा चुकीचा अर्थ लावू नका आणि कोणतीही माहिती पडताळणी न करता त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन तिने केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील गुडलक चौकात डी जे विरोधात काही पुणेकर एकवटले

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

७ आठवड्यांची गरोदर होती इन्फ्लुएन्सर; जिवंत जाळण्यापूर्वी घडलेला भयानक प्रकार समोर

Akola : अकोल्यात खाद्यतेलाच्या दोन पेढ्यांवर FDAची मोठी कारवाई; 11.82 लाखांचा तेलसाठा जप्त

SCROLL FOR NEXT