Neena Gupta On Masaba Gupta Divorce Instagram
मनोरंजन बातम्या

Neena Gupta On Masaba Gupta Divorce: मुलीचा घटस्फोट, पण अभिनेत्री स्वतःलाच देतेय दोष; म्हणाली, माझंच चुकलं!

Neena Gupta And Daughter Masaba Gupta: नुकत्याच एका मुलाखतीत मसाबा खुलासा करत म्हणाली की, नीना गुप्ता मुलीच्या घटस्फोटासाठी स्वत:ला जबाबदार ठरवत आहे.

Chetan Bodke

Neena Gupta On Masaba Gupta Divorce

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक आणि सुप्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ता सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मसाबा गुप्ता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘मसाबा मसाबा’ या वेबसीरिजमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामध्ये मसाबासोबतच तिची आई आणि अभिनेत्री नीना गुप्ता देखील मुख्य भूमिकेत होती.

मसाबाने दिलेली मुलाखत सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मसाबा खुलासा करत म्हणाली की, आई नीना गुप्ता तिच्या घटस्फोटासाठी स्वत:ला जबाबदार ठरवलंय.

मसाबाने नुकतीच ट्विंकल खन्नाच्या ‘ट्विकइंडिया’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने मुलाखतीत तिचा पुर्वाश्रमीचा पती आणि निर्माता मधु मंतेनाबद्दल बोलताना मसाबा म्हणाली की, “माझ्या आईची इच्छा होती की, मी लवकरात लवकर लग्न करावे. ज्यावेळी माझा आणि मधु मंतेनाचा घटस्फोट झाला, त्यावेळी मी खूपच चिंतेत होती. मी आणि मधु मंतेना एकमेकांपासून विभक्त होत होतो, त्या गोष्टीवर माझ्या आईला विश्वास बसत नव्हता. आई म्हणायची की, तू नुकतंच तुझ्या नव्या आयुष्याला सुरूवात केली, आणि लगेचच संपत आहे. तुमच्या लग्नाला फक्त दोन वर्षच झालेय, तुम्ही एकमेकांना जास्त वेळ सुद्धा दिला नाही.”

पुढे मसाबा म्हणाली, “मला लग्नाआधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची इच्छा होती. पण लग्नापूर्वी लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी माझ्या आईने मला विरोध केला होता. जेव्हा तिला आमच्या रिलेशनशिपबद्दल कळालं. तेव्हा, तिने लगेचंच माझं सर्व सामान बांधलं आणि मला घरातून निघून जायला सांगितलं.”

“दुसऱ्याच दिवशी आईने माझं कोर्ट मॅरेज करून दिलं. लग्नाशिवाय कोणी कधीही निघून जाऊ शकतं यावर तिचा विश्वास होता. आईने जी चूक केली तिच चूक मी करू नये, अशी आईची इच्छा होती. म्हणून, आईला माझं लवकरात लवकर लग्न करायचं होतं.”

पुढे आपल्या मुलाखतीत मसाबा म्हणाली, “ज्यावेळी माझा घटस्फोट झाला तेव्हा, आई खूप दुःखी होती. हे सर्व माझ्या चुकीमुळे घडल्याचे आई म्हणत होती. मी तुला लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची परवानगी द्यायला हवी होती. मी खूप वाईट आई आहे.”

दरम्यान मसाबाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर, मसाबाने २०१५ मध्ये पती आणि निर्माता मधु मंतेनासोबत लग्नगाठ बांधली होती. २०१९ मध्ये त्यांचं काही कारणास्तव घटस्फोट झाला होता. सध्या मसाबा दुसरा पती सत्यदीप मिश्रासोबत आपले वैवाहिक जीवन जगत आहे. तिने सत्यदिप मिश्रासोबत जानेवारी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT