Malaika Arora At Zee Marathi Award  Saam TV
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Video: झी मराठी पुरस्कार सोहळ्यात मलायकाचा धमाकेदार डान्स; मराठी कलाकारांनाही पडली अभिनेत्रीच्या सौंदर्याची भुरळ

Malaika Arora Dance: झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Malaika Arora Dance Video At Zee Marathi Award Show:

अभिनेत्री मलायका अरोरा नुकताच तिचा ५० वा वाढदिवस साजरा केला आहे. तिला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेता अर्जुन कपूरने देखील मलायकासाठी खास पोस्ट शेअर केली होती.

काही दिवसांपूर्वी मलायका मराठीमोळ्या अवतारात दिसली होती. अभिनेत्री श्रेया बुगने देखील मलायकाचा एक व्हिडीओ शेअर करत तिचे कौतुक केले होते. मलायकाचा आणखी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका लाडू वळताना दिसत आहे.

झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. बहुचर्चित 'झी मराठी' पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे. या पुरस्कार सोहळ्याला मलायकाने हजेरी लावली होती. पुरस्कार सोहळ्यातील या प्रोमो व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

मलायका अरोराने पुरस्कार सोहळ्यात तिच्या डान्सचा जलवा देखील दाखवला. मराठी आणि हिंदीमधील लोकप्रिय गाण्यांवर मलायकाने डान्स सादर केला. या गाण्यामध्ये 'ढगाला लागली कळ' आणि 'छय्या छय्या' या गाण्याचा समावेश होता.

त्यानंतर मलायकाने श्रेया बुगडेसह मंचावर लाडू वळल्याचे देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच मलायका सलील कुलकर्णी यांच्याकडे पाहून म्हणते, 'फक्त लाडू देणार, पण मी नाही येणार.'

मलायका अरोराचा लूक

मलायकाने डान्स परफॉर्मन्स वेळी गोल्डन रंगाचा डीपनेक ब्लाऊज घातला होता. तर रेड स्कर्ट घातला होता. केसात गजरा मळाला होता, कपाळाला टिकली लावली होती, तर तिच्या नाकात नाथ देखील होती. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल विरोधात लागला; ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार की नाही केलं स्पष्ट

Singer Home Attack: प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार; मोठा खुलासा करत म्हणाला, 'सलमान खानसोबत मैत्री...'

Maharashtra News Live Update: जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट गडद

नामांकित कंपनीच्या संचालकाने आयुष्य संपवलं, औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! ₹2 लाख जमा करा, फक्त इतक्या वर्षात मिळेल ₹89,990 व्याज; सरकारची गॅरंटी

SCROLL FOR NEXT