Madhuri Dixit SAAM TV
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit : फॅन रॉक माधुरी शॉक! अचानक फोटो काढायला फॅन स्टेजवर, 'धकधक गर्ल'चा मूड झाला ऑफ

Madhuri Dixit Viral Video : माधुरी दीक्षितचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात चाहत्यांना पाहून माधुरीला धक्का बसला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' कायमच तिच्या लूक आणि चित्रपटासाठी ओळखली जाते. आजवर माधुरी दीक्षितने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. माधुरी दीक्षितने बॉलिवूड गाजवले आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांसोबत पाहायला मिळत आहे.

8 मार्चला माधुरी दीक्षितने एक 'महिला दिन' विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली. त्या कार्यक्रमातील हा व्हायरल व्हिडीओ आहे. तेव्हा माधुरी दीक्षित स्टेजवर उभे असतातना अचानक दोन महिला चाहत्या स्टेजवर येऊन माधुरीसोबत सेल्फी काढायला लागतात. तिच्या अगदी शेजारी उभ्या राहतात. हे पाहून माधुरी चकीत होते. माधुरी दीक्षित मंचावर फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देताना गर्दीमधून दोन महिला मंचावर आल्या आणि त्या माधुरी दीक्षितच्या दोन्ही बाजूने उभ्या राहील्या. त्यातील एक चाहती माधुरीच्या खांद्यावर देखील हात ठेवते.

माधुरीचा लूक

कार्यक्रमासाठी माधुरीने एक खास लूक केला होता. तिने वेर्स्टन गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यात माधुरी दीक्षित खूपच सुंदर दिसत आहे. लूकला साजेल असा तिने मेकअप केला आहे. माधुरीचा लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत. माधुरी दीक्षितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने कमेंट केली की, "फॅन रॉक माधुरी मॅम शॉक"

माधुरी दीक्षित अलिकडेच 'भूल भुलैया ३'मध्ये पाहायला मिळाली आहे. चाहते माधुरीच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. माधुरी दीक्षितचे इन्स्टाग्रामवर 39.6 मिलियन फॉलोअर्स आहे. माधुरी कायमच आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या फोटोंवर कायमच चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

SCROLL FOR NEXT