Katrina Kaif Spotted At Airport Instagram
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif Spotted At Airport: कतरिना कैफला एअरपोर्टवर चाहत्यांकडून धक्का बुक्की, गर्दी पांगवण्यासाठी सेक्योरिटीने लावली अनोखी शक्कल, Video Viral

Chetan Bodke

Katrina Kaif Security With Fans: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नेहमीच आपल्या फॅशनमुळे आणि तिच्या फिटनेसमुळे ती चाहत्यांमध्ये चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दुर असलेली कॅट लवकरच ‘टायगर ३’मध्ये ती सलमान खानसोबत झळकणार आहे. नुकतीच अभिनेत्री परदेशात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. त्यावेळी अभिनेत्री विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाली होती.

अभिनेत्रीला पाहताच चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच धूम ठोकली. यावेळी अभिनेत्रीने ब्लू जीन्स आणि ब्राऊन टॉपमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसून येत होती. सध्या अभिनेत्रीचा हा एअरपोर्ट लूक खूप चर्चेचा विषय ठरला आहे.

कतरिना सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी न्युयॉर्कला गेली होती. न्यूयॉर्कवरून अभिनेत्री काल मुंबईला परतली आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी एअरपोर्टवरच तिच्या भोवती गराडा घातला. यावेळी अभिनेत्रीचा हा कॅज्युअल लूक फारच चर्चेचा विषय होता. अभिनेत्री त्या लूकमध्ये खूपच क्यूट दिसत होती. कतरिना कैफ नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.

न्यूयॉर्कहून मुंबईला परतत असताना, कतरिनासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमली होती. एअरपोर्टवर कतरिनाला चारही बाजूंनी चाहत्यांचाच गराडा होता. चाहत्यांच्या गराड्यातून बाहेर पडणं अभिनेत्रीला फारच कठीण झालं होतं. मात्र लगेचच परिस्थिती हाताळत कतरिनाच्या सुरक्षा रक्षकाने चाहत्यांना बाजूला सारत तिचा मार्ग मोकळा केला.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सध्या अभिनेत्री ‘जी ले जरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कतरिना कैफचा अखेरचा चित्रपट शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत ‘फोन भूत’ हा चित्रपट ठरला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतकी खास कमाई केली नव्हती. त्याचबरोबर कतरिना लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर ३’ मध्ये दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

UPSC चा आणखी एक घोटाळा, मुख्य परीक्षेचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप!

Breaking News Live : नौदल दिनानिमित्त कार्यक्रमात PM नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा

Nana Patole : ''त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका..''; नाना पटोले स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT