Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगनाने पुन्हा 'पठान'च्या यशाबद्दल केले वादग्रस्त विधान, म्हणते 'या देशाने फक्त खानांनाच प्रेम...'

नुकतेच बॉलिवूड चित्रपट निर्मात्या प्रिया गुप्ता यांनी 'पठान' चित्रपटाविषयी एक ट्वीट केले असून त्यावर कंगना रणौतने ट्वीट करत वादग्रस्त विधान केले आहे.

Chetan Bodke

Kangana Ranaut: बॉलिवूडची ड्रामा क्वीन कंगना रणौत सध्या शाहरुखच्या पाठी चांगलीच हात धुवून लागली आहे, असं बोललं तर वावगं ठरणार नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून 'पठान' विरोधात रोज काही ना काही तरी ट्वीट करते. यावर तिला अनेकदा नेटकऱ्यांनी खडेबोल देखील सुनावले आहेत. नुकतेच बॉलिवूड चित्रपट निर्मात्या प्रिया गुप्ता यांनी चित्रपटाविषयी एक ट्वीट केले होतं. त्यावर आता बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौतने तिला प्रत्युत्तर ट्वीट केलं आहे. कंगनाने पठानला मिळालेल्या अभूतपुर्व यशाबद्दल आश्चर्य व्यक्त करत भारतीय नागरिकांवरही आश्चर्यकारक आरोप केले आहेत.

ट्वीटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये बॉलिवूड निर्मात्या म्हणतात, " 'पठान'च्या शानदार यशाबद्दल शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचे अभिनंदन!!! यावरून हे सिद्ध होते की हिंदू मुस्लिम शाहरुख खानवर तितकेच प्रेम करतात, बहिष्कारामुळे चित्रपटाचे नुकसान होत नाही तर मदत होते, चित्रपटाचे दमदार संगीत आहे आणि भारत सुपर सेक्युलर आहे.'

यावर प्रत्युत्तर करत कंगना म्हणते, "खूप चांगले विश्लेषण… या देशाने फक्त आणि फक्त सर्व खानांवर प्रेम केले आहे. सोबतच काही मुस्लिम अभिनेत्रींनीही देशाला वेड लागले आहे, त्यामुळे भारतावर द्वेष आणि फॅसिझमचा आरोप करणे अत्यंत अयोग्य आहे… संपूर्ण जगात भारतासारखा देश नाही ."

कंगनाने याआधीही 'पठान' चित्रपटाविरोधात अनेक ट्वीट्स केले आहे, यावरुन ती अनेकदा ट्रोल देखील झाली आहे. चित्रपटाला देण्यात आलेल्या शीर्षकावरुन तिने चित्रपटाचे पाकिस्तान कनेक्शन असल्याचे सांगितले. तर अनेक कारणं दाखवत ती चित्रपटाला लक्ष्य करते.

पठानला मिळालेले यश पाहुन कंगना विशेष खूश नसल्याचे दिसते. मात्र, चित्रपटाच्या जबरदस्त कमाईबद्दल तिने चित्रपटातील मुख्य कलाकारांचे अभिनंदन केले आहे.

कंगना तब्बल दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा ट्वीटरवर परतली आहे. ट्वीटरवर सक्रिय होताच तिने पुन्हा एकदा बॉलिवूडवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. कंगनाची नेहमीच बॉलिवूडवरील नाराजी स्पष्टपणे दिसून आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2026: आयटीआर कधीपासून फाइल करता येणार? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Electricity Bill : वीज बिल हरवले? फक्त २ मिनिटांत मोबईल फोनवरून मिळेल, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra Live News Update : जय पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर

Airtel Recharge : खुशखबर! ५० रुपयांत OTT, IPLची मज्जा; एअरटेलचा भन्नाट रिचार्ज प्लान

नाशिकमध्ये खरात पार्ट 2 ! महिलांसोबतचे 121 व्हिडिओ; फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी

SCROLL FOR NEXT