Kangana Ranaut Saam TV
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगना रनौत राजकारणात प्रवेश करणार; स्वत: केला खुलासा

कंगनाचा हाच डॅशींग अंदाज पाहता ती राजकारणात येणार का? असा प्रश्न आजवर तिच्या अनेक चाहत्यांना पडला आहे.

Ruchika Jadhav

Bollywood Actress :बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेचा विषय असते. तिने आजवर बॉलिवूडसह राज्याच्या राजकीय घडामोडींवर देखील परखड मत व्यक्त केलं आहे. कंगनाचा हाच डॅशींग अंदाज पाहता ती राजकारणात येणार का? असा प्रश्न आजवर तिच्या अनेक चाहत्यांना पडला आहे. कंगनाने आता याच प्रश्नावर पुन्हा एकदा बिंधास्तपणे उत्तर दिलंय. (Latest Marathi News)

कंगनाने नुकतीच एका चॅनलवर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिला राजकारणात प्रवेश करायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर कंगनाने आपल्या शैलीस उत्तर देत म्हटलं आहे की, "मला आधीपासूनच समाजकार्यात रस आहे. त्याचबरोबर मला राजकारणाचीही आवड आहे. त्यामुळे जर कोणत्याही राजकीय पक्षाने मला संधी दिली तर मी नक्कीच राजकारणात प्रवेश करेल.", असं कंगनाने म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगनाच्या मुंबईतील मालमत्तेवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. त्याचा उल्लेख करत कंगना पुढे म्हणाली की, मी नेहमीच देशाचा विचार करुन माझं मत व्यक्त करते. यात अनेक व्यक्तींना माझं मत खटकतं.

ते मला चुकीचं समजतात. जेव्हा माझ्या मुंबईतील मालमत्तेवर कारवाई झाली तेव्हा सत्ताधाऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या ताकतीचा चुकीचा वापर केला, असं म्हणत कंगनाने (Kangana) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's horoscope: शुक्रवार शुभ! श्रवण नक्षत्र आणि शुभ योगाचा संयोग; ‘या’ राशींचं भाग्य जबरदस्त चमकणार

Todays Horoscope: 'या' राशींसाठी दिवाळीची सुरुवात दणक्यात होणार; वाचा आजचं राशीभविष्य

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

SCROLL FOR NEXT