Kangana Ranaut Compare With Twitter CEO
Kangana Ranaut Compare With Twitter CEO Twitter
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Compare With Twitter CEO: कंगना बावचळली, स्वत:च करतेय ट्विटरच्या सीईओ सोबत तुलना...

Chetan Bodke

Kangana Ranaut Compare With Twitter CEO Elon Musk: सोशल मीडियावर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाची ट्विटरवर घरवापसी झाल्यानंतर कमालीची चर्चेत आली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींना खडेबोल सुनावत सर्वांचं लक्ष आपल्याकडे ती वेधत असते. स्पष्टवक्तेपणा कंगनाला चांगलाच नडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण ट्विटरकडून तिचं आणि तिच्या बहिणीचं अकाऊंट एकत्रच ब्लॉक करण्यात आलं होतं. आता पुन्हा तिची ट्विटर वापसी झाली असून तिने पुन्हा एकदा ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांचे तोंडभरून कौतुक करत आपली तुलना त्यांच्यासोबत केली.

ट्विटरकडून अकाऊंट बंद करण्यात आलं असलंं तरी तिने आपली टिव टिव काही मात्र बंद केली नाही. अनेकदा बॉलिवूडमधील वाद, काही सेलिब्रिटींसोबत असणारी मनातील खद खद, सामाजिक विषयांवर आपले स्पष्ट मत मांडण्याचा ती नेहमीच काम करते. ते अनेकदा तिला भोवलं देखील आहे. आता नुकतंच तिने सोशल मीडियावर ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांच्यासोबत आपली तुलना केली आहे. आता ही तुलना तिला अंगलट येणार का हे पुढचा काळच आपल्याला सांगेल.

नुकतंच कंगनाने नवीन ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये कंगनाने ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांच्यासोबतच थेट आपली तुलना केली आहे. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “तुम्हीच आम्हाला तुमचा आदर करण्यासाठी आणखी किती कारणं देणार आहात हे सांगाल का?,” यापूर्वी देखील कंगनानं एलन मस्क यांची स्तूती केल्याचे दिसून आले आहे. कंगनाच्या या ट्विटवर चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.

ट्विटरचे सर्व सुत्र एलॉन मस्क यांनी हाती घेतल्यानंतर अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यातीलच एक निर्णय म्हणजे कंगनाची ट्विटरवर घरवापसी. कंगनानं आता ट्विटर हे बेस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्याचे म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT