प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगण हिची आई आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. तनुजा यांना वयोमानानुसार उद्भवत असणाऱ्या काही आजारांमुळे जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, सध्या तनुजा ह्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. तनुजा यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून काळजी करण्याची कोणतीही गोष्ट नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वयोमानानुसार उद्भवत असणाऱ्या काही आजारांमुळे जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Actress)
तनुजाचा यांचा २३ सप्टेंबर १९४३ रोजी जन्म झाला आहे. बॉलिवूडची चुलबुली म्हणून तनुजा यांची सर्वत्र ओळख आहे. अभिनेत्रीने अवघ्या लहान वयातच आपल्या अभिनयाने सर्वांना चकित केले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तनुजा यांनी 'छबिली' या पहिल्या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यांचा हा पहिला चित्रपट १९६० मध्ये रिलीज झाला होता. तनुजा यांनी फक्त हिंदीच नाही तर, बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांची तनुजा समर्थ मुलगी आहे. (Bollywood Film)
तनुजा यांनी 'बहारें फिर भी आएंगी', 'ज्वेल थीफ', 'हाथी मेरे साथी' आणि 'मेरे जीवन साथी' सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तनुजा यांनी अनेक बंगाली चित्रपटामध्ये काम केले आहे. तनुजा यांची आणि निर्माते शोमू मुखर्जी यांची 'एक बार मुस्कुरा दो' चित्रपटाच्या निमित्ताने भेट झाली होती. तनुजा आणि चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी यांनी १९७३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. शोमू मुखर्जी आणि तनुजा यांना काजोल मुखर्जी आणि तनिषा मुखर्जी अशा दोन मुली आहेत. त्यातील काजल आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असून तनिषा मुखर्जीला खास ओळख मिळाली नाही. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.