Jaya Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan Vs Paparazzi: जया बच्चन पुन्हा पापाराझींवर संतापल्या; म्हणाल्या, तुम्ही घुसखोर...

जया बच्चन यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या पापाराझींवर ओरडताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jaya Bachchan Latest News: ज्येष्ठ अभिनेत्री आणि सपाच्या खासदार जया बच्चन आणि पापाराझींचे कधीच पटत नाही असे दिसते. अनेकदा त्या माध्यमांच्या कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सवर भडकताना दिसतात. अलीकडेच जया बच्चन या दिवाळीत पापाराझींवर पुन्हा एकदा वैतागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये जया बच्चन (Jaya Bachchan) कॅमेरामनवर ओरडतानाच नाही, तर त्याला त्याला सळो की पळो करताना दिसत आहे. जया बच्चन यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या पापाराझींवर ओरडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की दिवाळी पूजेसाठी पापाराझी बच्चन कुटुंबाचे फोटो काढण्यासाठी आले होते, परंतु त्यांना हे बहुतेक आवडले नाही. त्यांनी पापराझींना फटकारण्यास सुरुवात केली.

जया बच्चन या पापाराझींना पाहताच भडकल्या. त्यांना विचारले, की "तुम्ही कसे काय कव्हरेज चित्रीत करत आहे?" यानंतर त्या पापाराझींना 'घुसखोर' म्हणाल्या. जया यांचा राग पाहून घटनास्थळी उपस्थित कॅमेरामननी लगेचच आपले कॅमेरे बंद करत ते घटनास्थळावरून निघून गेले.

जया बच्चन यांच्या या व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट करत पापाराझींना प्रश्न विचारले आहेत. त्यांना एकटे सोडा. तसेच एक यूजर म्हणतो, 'तुम्ही लोक त्यांचे फोटो का काढत आहात? त्यांना एकटे सोडा. तुम्ही या मॅडमसाठी तुमचा वेळ वाया घालवू नका. दुसऱ्याने लिहिले, 'पापाराझींसोबत नीट बोलू शकत नाही का? तो दिवसभर त्यांच्या फोटोची वाट पाहत असतो.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Maharashtra News Live Update : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांचा विजय

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

Weekly Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT