Janhavi Kapoor  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Janhavi Kapoor: जान्हवीने 'ओम शांती ओम' केला रिक्रिएट, चर्चा तर रंगणारच

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसतय की जान्हवीने 'ओम शांती ओम'चा आयकॉनिक सीन रिक्रिएट केलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Janhavi Kapoor: बऱ्याच कलाकारांचे स्टारकिड्स अभिनयात पदार्पण करीत आहे. काही स्टारकिड्सला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहे, तर काही स्टारकिड्सला इतका खास प्रतिसाद मिळत नाही. त्यातीलच सध्याची एक अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. जान्हवीने आपल्या आईच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आईच्या पावलावर पाऊल ठेवत उत्तम अभिनय साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य करीत आहे.

जान्हवीने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरेच फोटो शेअर करत असते. काही वेळा त्या पोस्टची टीका पण होते. फोटोंसोबत ती रील्सही बनवत असते. त्यामुळे ती अधिकच चर्चेत असते. बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'ओम शांती ओम' चित्रपट होय. या चित्रपटांने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली होती.

फराह खानच्या 'ओम शांती ओम'ला नुकतीच 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. सर्व बाजूंनी दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, जान्हवी कपूरने एका मजेदार व्हिडिओसह चित्रपटाला विनोदी श्रद्धांजली वाहिली. या व्हिडीओत दिसतय की जान्हवीने 'ओम शांती ओम'चा आयकॉनिक सीन रिक्रिएट केलेला आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या भूमिकेने एक वेगळीच प्रतिमा तयार केली आहे.

जान्हवी कपूर एका मोठ्या झुंबराखाली उभी राहिली आहे. तिचा मित्रही व्हिडीओमध्ये दिसत आहे. जान्हवी म्हणते 'याच झुंबरखाली माझ्या शांतीची लाश सापडली'. पुढे तिचा मित्र तिच्यावर हसतो. हा व्हिडीओ शेअर करत जान्हवीने लिहिले, 'ही शांती वेगळीच दिसत आहे'. तिच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. तिच्या चाहत्यांनी व्हिडिओवर अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

जान्हवीने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिच्या चाहत्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. जान्हवी आगामी चित्रपट 'जन गन मन' मध्ये दिसणार असून ज्यामध्ये ती दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि पूजा हेगडेसोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त जान्हवी करण जोहरचा 'दोस्ताना 2' या चित्रपटात ही दिसणार आहे. जान्हवीचा नुकताच 'मिली' चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाई करु शकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT